< स्तोत्रसंहिता 34 >
1 १ दाविदाचे स्तोत्र; त्याने अबीमलेखापुढे आपली चर्या बदलल्यावर त्यास त्याने हाकलून लावले, आणि तो तेथून निघून गेला तेव्हाचे त्याचे गीत. मी सर्व समयी परमेश्वरास स्तुती देईन. माझ्या मुखात नेहमी त्याची स्तुती असेल.
Di Davide, quando si finse insensato davanti ad Abimelec e, cacciato da lui, se ne andò. Io benedirò l’Eterno in ogni tempo; la sua lode sarà del continuo nella mia bocca.
2 २ मी परमेश्वराची स्तुती करणार, विनम्र ऐकतील आणि आनंद करतील.
L’anima mia si glorierà nell’Eterno; gli umili l’udranno e si rallegreranno.
3 ३ तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वरास स्तुती द्या. आपण एकत्र त्याच्या नावाला उंचावू या.
Magnificate meco l’Eterno, ed esaltiamo il suo nome tutti insieme.
4 ४ मी परमेश्वराकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने मला उत्तर दिले. आणि त्याने मला माझ्या सर्व भयांवर विजय दिला.
Io ho cercato l’Eterno, ed egli m’ha risposto e m’ha liberato da tutti i miei spaventi.
5 ५ जे त्याच्याकडे पाहतील ते चकाकतील, आणि त्यांची मुखे कधीच लज्जीत होणार नाहीत.
Quelli che riguardano a lui sono illuminati, e le loro facce non sono svergognate.
6 ६ या पीडलेल्या मनुष्याने आरोळी केली, आणि परमेश्वराने त्याचे ऐकले आणि त्यास त्याच्या सर्व संकटातून सोडवले.
Quest’afflitto ha gridato, e l’Eterno l’ha esaudito e l’ha salvato da tutte le sue distrette.
7 ७ परमेश्वराचे भय धरणाऱ्याभोवती तो छावणी करतो. आणि त्यास वाचवतो.
L’Angelo dell’Eterno s’accampa intorno a quelli che lo temono, e li libera.
8 ८ परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा. धन्य तो पुरुष जो त्याच्याठायी आश्रय घेतो.
Gustate e vedete quanto l’Eterno è buono! Beato l’uomo che confida in lui.
9 ९ जे तुम्ही त्याचे निवडलेले आहा, ते तुम्ही परमेश्वराचे भय धरा. त्याचे भय धरणाऱ्यांस कशाचीच कमतरता भासत नाही.
Temete l’Eterno, voi suoi santi, poiché nulla manca a quelli che lo temono.
10 १० तरुण सिंहाना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात, परंतु जे परमेश्वरास शोधतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव पडणार नाही.
I leoncelli soffron penuria e fame, ma quelli che cercano l’Eterno non mancano d’alcun bene.
11 ११ मुलांनो माझे ऐका आणि मी तुम्हास परमेश्वराचे भय कसे धरावे हे शिकवीन.
Venite, figliuoli, ascoltatemi; io v’insegnerò il timor dell’Eterno.
12 १२ सुख पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो आणि दिवसाची आवड धरतो तो मनुष्य कोण आहे?
Qual è l’uomo che prenda piacere nella vita, ed ami lunghezza di giorni per goder del bene?
13 १३ तर वाईट बोलण्यापासून आवर, आणि तुझे ओठ खोटे बोलण्यापासून आवर.
Guarda la tua lingua dal male a le tue labbra dal parlar con frode.
14 १४ वाईट कृत्ये करणे सोडून दे आणि चांगली कृत्ये कर. शांतीचा शोध कर आणि तिच्यामागे लाग.
Dipartiti dal male e fa’ il bene; cerca la pace, e procacciala.
15 १५ परमेश्वराची दृष्टी नितीमानांवर आहे, त्याचे कान त्याच्या आरोळीकडे असतात.
Gli occhi dell’Eterno sono sui giusti e le sue orecchie sono attente al loro grido.
16 १६ परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्याविरुध्द आहे. तो त्यांची आठवण पृथ्वीतून नाश करतो.
La faccia dell’Eterno è contro quelli che fanno il male per sterminare di sulla terra la loro memoria.
17 १७ नितीमान आरोळी करतो आणि परमेश्वर ते ऐकतो, आणि तो तुम्हास तुमच्या सर्व संकटातून वाचवेल.
I giusti gridano e l’Eterno li esaudisce e li libera da tutte le loro distrette.
18 १८ जे हृदयाने तुटलेले आहेत, त्यांच्याजवळ परमेश्वर आहे. आणि तो खिन्न झालेल्या आत्म्यास तारतो.
L’Eterno e vicino a quelli che hanno il cuor rotto, e salva quelli che hanno lo spirito contrito.
19 १९ नितीमानाचे कष्ट पुष्कळ आहेत, परंतू परमेश्वर त्या सर्वांवर त्यांना विजय मिळवून देईल.
Molte sono le afflizioni del giusto; ma l’Eterno lo libera da tutte.
20 २० परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल. त्यांतले एकही हाड तो मोडू देणार नाही.
Egli preserva tutte le ossa di lui, non uno ne è rotto.
21 २१ परंतु दुष्टाई दुष्टाला मारुन टाकील, जो नितीमानाचा द्वेष करतो तो दोषी ठरवला जाईल.
La malvagità farà perire il malvagio, e quelli che odiano il giusto saranno condannati.
22 २२ परमेश्वर त्याच्या सेवकाच्या आत्म्यांना तारेल. त्याच्यात आश्रय घेणारा कोणीही दोषी ठरवला जाणार नाही.
L’Eterno riscatta l’anima de’ suoi servitori, e nessun di quelli che confidano in lui sarà condannato.