< स्तोत्रसंहिता 33 >
1 १ न्यायी जनहो! परमेश्वरामध्ये आनंद करा, न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा.
KOMAIL me pun kan polauleki Ieowa, me lelapok kan en kapina i.
2 २ वीणा वाजवून परमेश्वरास धन्यवाद द्या; दहा तारांच्या वाद्यावर त्याचे गुणगान गा.
Danke Ieowa o kapikapina ki men kajan o kaule ki on i jal en arp eijok.
3 ३ त्याच्यासाठी नवे गीत गा; मोठा आवाज करून कौशल्याने वाद्ये वाजवा.
Kauleki on i kaul kap pot, komail kanai on arp o nil!
4 ४ कारण परमेश्वरचे वचन सरळ आहे, आणि तो जे करतो ते प्रामाणिकपणाने करतो.
Pwe maj an en Ieowa me inen o a wiawia kan karoj melel.
5 ५ देवाला चांगलुपणा आणि न्यायीपण प्रिय आहे, परमेश्वराच्या प्रेमदयेने पृथ्वी भरलेली आहे.
A kin kotin pok on me pun o melel, jappa direki kalanan en Ieowa.
6 ६ परमेश्वराच्या शब्दाकडून आकाशे निर्माण झाली आणि त्याच्या मुखातील श्वासाने सर्व तारे निर्माण झाले आहेत.
Nanlan wiaui kida majan en Ieowa o audepan a karoj ki nen en jilan i.
7 ७ तो समुद्रातील पाणी ढीगासारखे एकत्र करतो, तो समुद्र कोठारामध्ये ठेवतो.
A kotin kolekol pena pil en madau dueta nan dal eu, o a kotin nekidala ad akan nan waja rir.
8 ८ सर्व पृथ्वी परमेश्वराचे भय बाळगो, जगात राहणारा प्रत्येक त्याच्या भीतीत उभा राहो.
Jappa karoj en lan Ieowa o karoj me kaukaujon nan jappa en wauneki i.
9 ९ कारण तो बोलला आणि ते झाले, त्याने आज्ञा केली आणि ते आपल्या ठिकाणी स्थिर झाले.
Pwe ma a kotin majanta, ap pan wiaui, o ma a kotin panokada, ap pan miela.
10 १० राष्ट्रांचा उपदेश परमेश्वर मोडतो, तो लोकांच्या योजनांवर अधिकार करतो.
Ieowa kin kotin kawela kapun en men liki kan, o a kin kawukila madamadaua en wei kan.
11 ११ परंतु परमेश्वराच्या योजना सर्वकाळ राहतात, त्याच्या हृदयातील योजना पिढ्यानपिढ्या स्थिर राहतात.
A me Ieowa kileledier, pan duedueta, o me a kotin kupurada, pan kokolata.
12 १२ परमेश्वर ज्या राष्ट्राचा देव आहे ते राष्ट्र आशीर्वादित आहे. ज्यांना त्याने आपल्या वतनाचे होण्यास निवडले आहे ते सुखी आहेत.
Meid pai wei o, me Ieowa ar Kot, o wei, me a kotin piladan a jojo.
13 १३ परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतो, तो सर्व लोकांस पाहातो.
Ieowa kin kotin ireron aramaj akan karoj jan nanlan.
14 १४ तो आपल्या राहण्याच्या ठिकाणाहून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांकडे पाहतो.
A kotin ireron karoj, me kaujon jappa jan mol a teneten.
15 १५ ज्याने सर्वांची हृदये घडवली तो त्या सर्वांची कृत्ये पारखतो, तोच तो आहे.
A kotin wiadar monion arail karoj, o a kotin mani ar wiawia kan karoj.
16 १६ पुष्कळ सैन्य असल्याने राजा तारला जात नाही. वीर योद्धा त्याच्या सामर्थ्याने वाचतो असे नाही.
Nanmarki amen jota pan pwai kida a karij toto, o ol komad amen jota pan dore kila a kelail.
17 १७ घोडा विजयासाठी व्यर्थ आहे. त्याच्या पुष्कळ बळाने तो कोणाला वाचवू शकत नाही.
Oj akan pil jota kak jauaja ekij o a kelail melel jota kadepa.
18 १८ पाहा! परमेश्वराची दृष्टी त्याचे भय बाळगणाऱ्यांवर आहे. जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात,
Kilan, jilan en Ieowa kin ireron on me lan i, o me kaporoporeki a kalanan.
19 १९ त्यांना मरणापासून, आणि दुष्काळापासून वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर आहे.
Pwen kapit ir ala jan ni mela o katekatunole ni anjau en lek.
20 २० आम्ही परमेश्वराची वाट पाहू, तो आमचे साहाय्य आणि आमची ढाल आहे.
Nen atail kin auiaui Ieowa, i me jauaj patail o pere patail.
21 २१ त्याच्यामध्ये आमचे हृदय हर्ष पावते, कारण आम्ही त्याच्या पवित्रतेत विश्वास ठेवतो.
Pwe monion atail kin peren kida i, pwe kitail kin liki mar a jaraui.
22 २२ परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे त्याप्रमाणे तुझी प्रेमदया आम्हाबरोबर असू दे.
Main, Ieowa, omui kalanan en mi po at duen at kaporoporeki komui.