< स्तोत्रसंहिता 33 >

1 न्यायी जनहो! परमेश्वरामध्ये आनंद करा, न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा.
义人哪,你们应当靠耶和华欢乐; 正直人的赞美是合宜的。
2 वीणा वाजवून परमेश्वरास धन्यवाद द्या; दहा तारांच्या वाद्यावर त्याचे गुणगान गा.
你们应当弹琴称谢耶和华, 用十弦瑟歌颂他。
3 त्याच्यासाठी नवे गीत गा; मोठा आवाज करून कौशल्याने वाद्ये वाजवा.
应当向他唱新歌, 弹得巧妙,声音洪亮。
4 कारण परमेश्वरचे वचन सरळ आहे, आणि तो जे करतो ते प्रामाणिकपणाने करतो.
因为耶和华的言语正直; 凡他所做的尽都诚实。
5 देवाला चांगलुपणा आणि न्यायीपण प्रिय आहे, परमेश्वराच्या प्रेमदयेने पृथ्वी भरलेली आहे.
他喜爱仁义公平; 遍地满了耶和华的慈爱。
6 परमेश्वराच्या शब्दाकडून आकाशे निर्माण झाली आणि त्याच्या मुखातील श्वासाने सर्व तारे निर्माण झाले आहेत.
诸天借耶和华的命而造; 万象借他口中的气而成。
7 तो समुद्रातील पाणी ढीगासारखे एकत्र करतो, तो समुद्र कोठारामध्ये ठेवतो.
他聚集海水如垒, 收藏深洋在库房。
8 सर्व पृथ्वी परमेश्वराचे भय बाळगो, जगात राहणारा प्रत्येक त्याच्या भीतीत उभा राहो.
愿全地都敬畏耶和华! 愿世上的居民都惧怕他!
9 कारण तो बोलला आणि ते झाले, त्याने आज्ञा केली आणि ते आपल्या ठिकाणी स्थिर झाले.
因为他说有,就有, 命立,就立。
10 १० राष्ट्रांचा उपदेश परमेश्वर मोडतो, तो लोकांच्या योजनांवर अधिकार करतो.
耶和华使列国的筹算归于无有, 使众民的思念无有功效。
11 ११ परंतु परमेश्वराच्या योजना सर्वकाळ राहतात, त्याच्या हृदयातील योजना पिढ्यानपिढ्या स्थिर राहतात.
耶和华的筹算永远立定; 他心中的思念万代常存。
12 १२ परमेश्वर ज्या राष्ट्राचा देव आहे ते राष्ट्र आशीर्वादित आहे. ज्यांना त्याने आपल्या वतनाचे होण्यास निवडले आहे ते सुखी आहेत.
以耶和华为 神的,那国是有福的! 他所拣选为自己产业的,那民是有福的!
13 १३ परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतो, तो सर्व लोकांस पाहातो.
耶和华从天上观看; 他看见一切的世人。
14 १४ तो आपल्या राहण्याच्या ठिकाणाहून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांकडे पाहतो.
从他的居所往外察看地上一切的居民—
15 १५ ज्याने सर्वांची हृदये घडवली तो त्या सर्वांची कृत्ये पारखतो, तोच तो आहे.
他是那造成他们众人心的, 留意他们一切作为的。
16 १६ पुष्कळ सैन्य असल्याने राजा तारला जात नाही. वीर योद्धा त्याच्या सामर्थ्याने वाचतो असे नाही.
君王不能因兵多得胜; 勇士不能因力大得救。
17 १७ घोडा विजयासाठी व्यर्थ आहे. त्याच्या पुष्कळ बळाने तो कोणाला वाचवू शकत नाही.
靠马得救是枉然的; 马也不能因力大救人。
18 १८ पाहा! परमेश्वराची दृष्टी त्याचे भय बाळगणाऱ्यांवर आहे. जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात,
耶和华的眼目看顾敬畏他的人 和仰望他慈爱的人,
19 १९ त्यांना मरणापासून, आणि दुष्काळापासून वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर आहे.
要救他们的命脱离死亡, 并使他们在饥荒中存活。
20 २० आम्ही परमेश्वराची वाट पाहू, तो आमचे साहाय्य आणि आमची ढाल आहे.
我们的心向来等候耶和华; 他是我们的帮助,我们的盾牌。
21 २१ त्याच्यामध्ये आमचे हृदय हर्ष पावते, कारण आम्ही त्याच्या पवित्रतेत विश्वास ठेवतो.
我们的心必靠他欢喜, 因为我们向来倚靠他的圣名。
22 २२ परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे त्याप्रमाणे तुझी प्रेमदया आम्हाबरोबर असू दे.
耶和华啊,求你照着我们所仰望你的, 向我们施行慈爱!

< स्तोत्रसंहिता 33 >