< स्तोत्रसंहिता 32 >
1 १ दाविदाचे स्तोत्र; मासकील (शिक्षण) ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे, ज्याचे अपराध झाकले गेले आहेत ते आशीर्वादित आहेस.
त्यो व्यक्ति धन्यको हो जसको अपराध क्षमा भएको छ, जसको पाप ढाकिएको छ ।
2 २ परमेश्वर ज्याच्या ठायी काही अपराध गणत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही तो सुखी आहे.
त्यो मानिस धन्यको हो जसको दोषको लेखा परमप्रभुले लिनुहुन्न र जसको आत्मामा छल छैन ।
3 ३ मी गप्प राहिलो, तेव्हा पूर्ण दिवस माझ्या, ओरडण्याने माझी हाडे जर्जर झाली.
जब म चूप लागें, तब दिनभरिको मेरो सुस्केराले मेरा हाडहरू खिइएर गए ।
4 ४ कारण रात्रंदिवस तुझा हात माझ्यावर भारी होता. उन्हाळ्यात उष्णतेमुळे माझी शक्ती सुकून गेली आहे.
किनकि दिन र रात ममाथि तपाईंको हात गह्रौं भयो । ग्रीष्टमको सुख्खाझैं मेरो बल सुक्यो ।
5 ५ तेव्हा मी परमेश्वरासमोर माझे अपराध कबूल केले, आणि मी माझा अपराध लपवला नाही, मी म्हणालो, परमेश्वरासमोर मी आपले पाप कबूल करीन, आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.
तब मैले आफ्नो पाप तपाईंमा स्वीकार गरें र मैले फेरि मेरो अधर्म लुकाइनँ । मैले भनें, “म आफ्ना अपराधहरू परमप्रभुमा स्वीकार गर्नेछु,” र तपाईंले मेरो पापको दोष क्षमा गर्नुभयो । सेल
6 ६ याच कारणास्तव प्रत्येक देवभक्त तू पावशील तेव्हा तुझी प्रार्थना करो. संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.
यसैले सबै धर्मीहरूले ठुलो कष्टको समयमा तपाईंमा प्रार्थना गर्नुपर्छ । तब पानीको उर्लने भेल ती मानिसहरूकहाँ पुग्नेछैन ।
7 ७ तू माझे लपण्याचे ठिकाण आहेस. तू मला संकटांपासून वाचवशील, विजयाच्या गीताने तू मला वेढशील. (सेला)
तपाईं मेरो लुक्ने ठाउँ हुनुहुन्छ । तपाईंले मलाई कष्टबाट सुरक्षा दिनुहुन्छ । तपाईंले मलाई विजयको गीतहरू घेर्नुहुनेछ ।
8 ८ परमेश्वर म्हणतो, “मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात, तू चालावे तो मी तुला शिकवीन. तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला बोध करीन.
म तँलाई शिक्षा दिनेछु र तँ हिंड्नुपर्ने बाटो सिकाउनेछु । तँमाथि मेरो दृष्टि राखेर म तँलाई शिक्षा दिनेछु ।
9 ९ म्हणून घोड्यासारखा व गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, ज्यांना काही समजत नाही. त्यांना आवरण्यासाठी लगाम व बागदोर असलाच पाहिजे. नाहीतर ते तुमच्या जवळ येणार नाहीत.”
घोडा वा खच्चरजस्तो नहो, जसको कुनै समझ हुँदैन । जहाँ तैंले इच्छा गर्छस् त्यहाँ तिनीहरूलाई लान तिनीहरूलाई अधीन गर्न लगाम र मुखारीले मात्र सकिन्छ ।
10 १० वाईट लोकांस खूप दु: ख भोगावे लागेल, परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे.
दुष्टलाई धेरै दुःखहरू हुन्छन्, तर परमप्रभुमा भरोसा गर्नेलाई उहाँको करारको विश्वस्तताले घेरा हाल्छ ।
11 ११ अहो न्यायी जनहो, परमेश्वराच्या ठायी आनंद व हर्ष करा. अहो सरळ जनहो हर्षाने तुम्ही जल्लोष करा.
ए धर्मीहरू हो, परमप्रभुमा खुसी होओ र आनन्दित होओ । सोझो हृदय हुनेहरू सबै जना आनन्दले कराओ ।