< स्तोत्रसंहिता 31 >
1 १ मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तुझ्यामध्ये मी आश्रय धरिला आहे, कधीच माझी निराशा होऊ देऊ नकोस. तुझ्या न्यायात मला वाचव.
Az éneklőmesternek, Dávid zsoltára. Te benned bíztam, Uram! Ne szégyenüljek meg soha; igazságoddal szabadíts meg engem.
2 २ माझे ऐक, त्वरीत मला वाचव, माझ्या आश्रयाचा खडक हो. माझा तारणारा बळकट दुर्ग असा हो.
Hajtsd hozzám füledet, hamar szabadíts meg; légy nékem erős kőszálam, erődített házam, hogy megtarts engem.
3 ३ कारण तू माझा खडक आणि माझा दुर्ग आहेस, तर तुझ्या नामास्तव मला मार्गदर्शन कर आणि मला चालव.
Mert kősziklám és védőváram vagy te; vezess hát engem a te nevedért és vezérelj engemet.
4 ४ त्यांनी गुप्तपणे रचलेल्या सापळ्यातून तू मला उपटून बाहेर काढ. कारण तू माझा आश्रय आहे.
Ments ki engem a hálóból, a melyet titkon vetettek nékem; hiszen te vagy az én erősségem.
5 ५ मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, हे परमेश्वरा, सत्याच्या देवा, तू मला खंडून घेतले आहे.
Kezedre bízom lelkemet, te váltasz meg engemet, oh Uram, hűséges Isten.
6 ६ जे निरुपयोगी मूर्तींची सेवा करतात, त्यांचा मी तिरस्कार करतो. परंतु मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो.
Gyűlölöm a hazug hiúságok híveit, és az Úrban bízom én.
7 ७ तुझ्या प्रेमदयेमध्ये मी आनंद आणि हर्ष करीन, कारण तू माझे दु: ख पाहिले आहेस.
Hadd vigadjak és örüljek a te kegyelmednek, a miért meglátod nyomorúságomat és megismered a háborúságokban lelkemet;
8 ८ तू मला माझ्या शत्रूंच्या हाती सोपवून दिले नाहीस. तू माझा पाय खुल्या विस्तीर्ण जागेत स्थिर केला आहे.
És nem rekesztesz be engem ellenség kezébe, sőt tágas térre állatod lábaimat.
9 ९ परमेश्वरा, माझ्यावर दया कर, कारण मी दु: खात आहे. माझे डोळे, माझा जीव, माझ्या देहासह क्षीण झाला आहे.
Könyörülj rajtam, Uram, mert szorongattatom; elsenyved a búbánat miatt szemem, lelkem, testem.
10 १० कारण माझे आयुष्य दु: खात आणि कण्हण्यात माझी वर्षे गेली आहेत. माझ्या पापांमुळे माझी शक्ती क्षीण झाली आहेत, आणि माझी हाडे झिजली आहेत.
Mert bánatban enyészik életem, és sóhajtásban múlnak éveim; bűnöm miatt roskadoz erőm, és kiasznak csontjaim.
11 ११ माझ्या शत्रूंमुळे लोक माझा तिरस्कार करतात माझ्या शेजाऱ्यास माझी परिस्थिती भयावह आहे, आणि जे मला ओखळतात त्यांना मी भय असा झालो आहे.
Temérdek üldözőm miatt csúfsággá lettem, kivált szomszédaimé, és ismerőseimnek félelmévé; a kik az utczán látnak, elfutnak tőlem.
12 १२ मृत पावलेल्या मनुष्यासारखा मी झालो आहे, ज्याची कोणी आठवण करत नाही. मी फुटलेल्या भांड्यासारखा झालो आहे.
Töröltettem, akár a halott, az emlékezetből; olyanná lettem, mint az elroshadt edény.
13 १३ कारण पुष्कळांनी केलीली निंदा मी ऐकली आहे, प्रत्येक बाजूनी भयावह बातमी आहे, ते माझ्याविरुध्द कट करत आहेत.
Mert hallottam sokak rágalmát, iszonyatosságot mindenfelől, a mint együtt tanácskoztak ellenem, és tervezték, hogy elrabolják lelkemet.
14 १४ परंतु परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे. तूच माझा देव आहेस, असे मी म्हणतो.
De én benned bízom, Uram! Azt mondom: Te vagy Istenem.
15 १५ माझे वेळ तुझ्या हातात आहे. मला माझ्या शत्रूंच्या आणि जे माझा पाठलाग करतात त्यांच्या हातातून सोडव.
Életem ideje kezedben van: szabadíts meg ellenségeim kezéből és üldözőimtől.
16 १६ तुझ्या सेवकावर तुझ्या मुखाचा प्रकाश चमकू दे. तुझ्या प्रेमदयेत मला तार.
Világosítsd meg orczádat a te szolgádon, tarts meg engem jóvoltodból.
17 १७ परमेश्वरा, मला निराश होऊ देऊ नकोस, कारण मी तुला हाक मारतो, दुष्ट निराश केला जावो, मृतलोकांत तो निःशब्द होवो. (Sheol )
Uram, ne szégyenüljek meg, mivelhogy hívlak téged; a gonoszok szégyenüljenek meg és pusztuljanak a Seolba. (Sheol )
18 १८ खोटे बोलणारे ओठ शांत केले जावोत, जसे ते नितीमानांच्याविरूद्ध असत्य आणि तिरस्काराने उद्धटपणे बोलतात.
A hazug ajkak némuljanak el, a melyek vakmerően szólnak az igaz ellen, kevélységgel és megvetéssel.
19 १९ जे तुझा आदर बाळगतात त्यांच्यासाठी तू आपला थोर चांगूलपणा जपून ठेवला आहे, जे तुझ्यामध्ये आश्रय घेतात त्यांच्याकरिता तू सर्व मानवजाती समोर घडवून आणतोस.
Mily bőséges a te jóságod, a melyet fentartasz a téged félőknek, és megbizonyítasz a te benned bízókon az emberek fiai előtt.
20 २० त्यांना आपल्या उपस्थितीच्या आश्रयात तू मनुष्याच्या कटापासून लपवशील. हिंसक जीभेपासून तू त्यांना मंडपात लपवशील.
Elrejted őket a te orczádnak rejtekében az emberek zendülései elől; sátorban őrzöd őket a perpatvarkodó nyelvektől.
21 २१ परमेश्वर धन्यवादित असो! कारण त्याने बळकट नगरात आपली आश्चर्यकारक प्रेमदया दाखवली आहे.
Áldott az Úr, hogy csodálatossá tette kegyelmét rajtam, mint egy megerősített városon!
22 २२ मी घाईत म्हणालो, मी तुझ्या नजरेसमोरून छेदून टाकलो आहे, तरी तू माझी मदतीची विनंती ऐकली, जेव्हा मी तुझ्याकडे आरोळी केली.
Én ugyan azt gondoltam ijedtemben: Elvettettem szemeid elől; de mégis, meghallgattad esedezéseimnek szavát, mikor kiáltottam hozzád.
23 २३ अहो सर्व परमेश्वराच्या मागे चालणाऱ्यांनो, त्याच्यावर प्रीती करा. कारण परमेश्वर विश्वासू लोकांचे रक्षण करतो. परंतु तो गर्विष्ठ्यांची परत फेड करतो.
Szeressétek az Urat mind ti ő kedveltjei; a híveket megőrzi az Úr és bőven megfizet a kevélyen cselekvőknek!
24 २४ जे तुम्ही परमेश्वरावर विश्वास करता, बलवान व धैर्यवान व्हा.
Legyetek erősek és bátorodjék a ti szívetek mindnyájan, a kik várjátok az Urat!