< स्तोत्रसंहिता 30 >
1 १ स्तोत्र; मंदिराच्या प्रतिस्थापनेच्या वेळचे गाणे. दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, मी तुला उंच करीन, कारण तू मला उठून उभे केले आहेस आणि माझ्या शत्रूंना माझ्यावर हर्ष करू दिला नाहीस.
Ensalzarte he, o! Jehová, porque me has ensalzado: y no hiciste alegrar a mis enemigos de mí.
2 २ हे परमेश्वरा, मी तुला मदतीस हाक मारली आणि तू मला बरे केले.
Jehová, Dios mío, clamé a ti, y me sanaste.
3 ३ हे परमेश्वरा तू माझ्या जीवाला मृतलोकांतून वर काढून आणलेस. मी खाचेत उतरू नये, म्हणून तू मला जिवंत राखले आहे. (Sheol )
Jehová, hiciste subir del sepulcro mi alma: dísteme vida de mi descendimiento a la sepultura. (Sheol )
4 ४ जे तुम्ही विश्वासयोग्य आहा, ते तुम्ही परमेश्वरास स्तुती गा. त्याची पवित्रता स्मरून त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
Cantád a Jehová sus misericordiosos: y celebrad la memoria de su santidad.
5 ५ कारण त्याचा राग काही क्षणाचा आहे, परंतु त्याचा अनुग्रह आयुष्यभर आहे. रडने कदाचीत रात्रभर असेल, परंतु सकाळी हर्ष होईलच.
Porque un momento hay en su furor, mas vida en su voluntad: a la tarde reposará el lloro, y a la mañana vendrá la alegría.
6 ६ मी आत्मविश्वासात म्हणालो, मी कधीही ढळणार नाही.
Y yo dije en mi quietud: No resbalaré jamás.
7 ७ होय, परमेश्वरा तुझ्या अनुग्रहाने मला बळकट पर्वतासारखे स्थापले आहे. परंतु जेव्हा तू आपले मुख लपवतोस तेव्हा मी भयभीत होतो.
Porque tú, Jehová, por tu benevolencia asentaste mi monte con fortaleza: mas escondiste tu rostro, y yo fui conturbado.
8 ८ परमेश्वरा, मी तुझ्याकडे आरोळी केली आणि माझ्या प्रभू कडून अनुग्रह मागितला.
A ti, o! Jehová, llamaré: y al Señor suplicaré.
9 ९ मी मरण पावल्यावर खाली थडग्यात गेलो तर काय लाभ? माती तुझी स्तुती करणार काय? ती तुझी विश्वासयोग्यता सांगेल काय?
¿Qué provecho hay en mi muerte, cuando yo descendiere al hoyo? ¿Loarte ha el polvo? ¿anunciará tu verdad?
10 १० हे परमेश्वरा, ऐक आणि माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा, मला मदत करणारा हो.
Oye, o! Jehová, y ten misericordia de mí: Jehová, sé mi ayudador.
11 ११ तू माझे शोक करणे, नाचण्यात पालटवला आहे. तू माझे गोणताट काढून मला हर्षाचे वस्र नेसवले आहेत.
Tú tornaste mi endecha en baile: desataste mi saco, y ceñísteme de alegría.
12 १२ म्हणून माझे हृदय तुझी स्तुती गाईल आणि शांत राहणार नाही. हे परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सर्वकाळ स्तुती करीन.
Por tanto a ti canté gloria, y no callé: Jehová Dios mío, para siempre te alabaré.