< स्तोत्रसंहिता 3 >

1 दावीदाचे स्तोत्र; जेव्हा तो आपला मुलगा अबशालोम याच्यापुढून पळाला. परमेश्वरा, माझे शत्रू पुष्कळ आहेत! पुष्कळ वळले आणि माझ्यावर हल्ला केला आहे.
מזמור לדוד בברחו מפני אבשלום בנו יהוה מה רבו צרי רבים קמים עלי׃
2 “परमेश्वराकडून त्यास काहीएक मदत होणार नाही,” असे माझ्याविरूद्ध बोलणारे पुष्कळ आहेत. सेला
רבים אמרים לנפשי אין ישועתה לו באלהים סלה׃
3 परंतु हे परमेश्वरा, तू माझ्या सभोवती ढाल असा आहेस, तू माझे वैभव, आणि माझे डोके वर करणारा आहे.
ואתה יהוה מגן בעדי כבודי ומרים ראשי׃
4 मी माझा आवाज परमेश्वराकडे उंच करीन, आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल. सेला
קולי אל יהוה אקרא ויענני מהר קדשו סלה׃
5 मी अंग टाकून झोपी गेलो; मी जागा झालो, कारण परमेश्वर माझे रक्षण करतो.
אני שכבתי ואישנה הקיצותי כי יהוה יסמכני׃
6 जे सर्वबाजूंनी माझ्यासाठी टपून बसले आहेत, त्या लोकसमुदायला मी घाबरणार नाही.
לא אירא מרבבות עם אשר סביב שתו עלי׃
7 हे परमेश्वरा उठ, माझ्या देवा, मला तार! कारण तू माझ्या सर्व शत्रूंच्या थोबाडीत मारली आहेस, तू दुष्टांचे दात पाडले आहेत.
קומה יהוה הושיעני אלהי כי הכית את כל איבי לחי שני רשעים שברת׃
8 तारण परमेश्वरापासूनच आहे, तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो. सेला.
ליהוה הישועה על עמך ברכתך סלה׃

< स्तोत्रसंहिता 3 >