< स्तोत्रसंहिता 3 >
1 १ दावीदाचे स्तोत्र; जेव्हा तो आपला मुलगा अबशालोम याच्यापुढून पळाला. परमेश्वरा, माझे शत्रू पुष्कळ आहेत! पुष्कळ वळले आणि माझ्यावर हल्ला केला आहे.
大卫逃避他儿子押沙龙的时候作的诗。 耶和华啊,我的敌人何其加增; 有许多人起来攻击我。
2 २ “परमेश्वराकडून त्यास काहीएक मदत होणार नाही,” असे माझ्याविरूद्ध बोलणारे पुष्कळ आहेत. सेला
有许多人议论我说: 他得不着 神的帮助。 (细拉)
3 ३ परंतु हे परमेश्वरा, तू माझ्या सभोवती ढाल असा आहेस, तू माझे वैभव, आणि माझे डोके वर करणारा आहे.
但你—耶和华是我四围的盾牌, 是我的荣耀,又是叫我抬起头来的。
4 ४ मी माझा आवाज परमेश्वराकडे उंच करीन, आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल. सेला
我用我的声音求告耶和华, 他就从他的圣山上应允我。 (细拉)
5 ५ मी अंग टाकून झोपी गेलो; मी जागा झालो, कारण परमेश्वर माझे रक्षण करतो.
我躺下睡觉,我醒着, 耶和华都保佑我。
6 ६ जे सर्वबाजूंनी माझ्यासाठी टपून बसले आहेत, त्या लोकसमुदायला मी घाबरणार नाही.
虽有成万的百姓来周围攻击我, 我也不怕。
7 ७ हे परमेश्वरा उठ, माझ्या देवा, मला तार! कारण तू माझ्या सर्व शत्रूंच्या थोबाडीत मारली आहेस, तू दुष्टांचे दात पाडले आहेत.
耶和华啊,求你起来! 我的 神啊,求你救我! 因为你打了我一切仇敌的腮骨, 敲碎了恶人的牙齿。
8 ८ तारण परमेश्वरापासूनच आहे, तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो. सेला.
救恩属乎耶和华; 愿你赐福给你的百姓。 (细拉)