< स्तोत्रसंहिता 29 >
1 १ दाविदाचे स्तोत्र. स्वर्गदूतहो, परमेश्वरास गौरव आणि सामर्थ्य आहे असे कबूल करा.
Inikeni iNkosi, lina madodana abalamandla, inikeni iNkosi udumo lamandla.
2 २ परमेश्वरास त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या; पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.
Inikeni iNkosi udumo lwebizo layo, likhothame eNkosini ebuhleni bobungcwele.
3 ३ परमेश्वराचा आवाज जलांवरून ऐकण्यात आला, गौरवशाली देव गर्जत आहे, परमेश्वर पुष्कळ जलांवर गर्जत आहे.
Ilizwi leNkosi liphezu kwamanzi; uNkulunkulu wenkazimulo uyaduma; iNkosi iphezu kwamanzi amanengi.
4 ४ परमेश्वराचा आवाज सामर्थशाली आहे, परमेश्वराचा आवाज चमत्कारीक आहे.
Ilizwi leNkosi lilamandla, ilizwi leNkosi lilobukhosi.
5 ५ परमेश्वराची वाणी देवदार वृक्षाला तोडते, परमेश्वर लबानोनाच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.
Ilizwi leNkosi lephula imisedari, yebo, iNkosi yephula imisedari yeLebhanoni.
6 ६ तो लबानोनला वासराप्रमाणे आणि सिर्योनला तरुण बैलाप्रमाणे बागडायला लावतो.
Yenza yona-ke iqolotshe njengethole, iLebhanoni leSiriyoni njengethole lenyathi.
7 ७ परमेश्वराची वाणी अग्नी ज्वालासह हल्ला करते.
Ilizwi leNkosi lidabula amalangabi omlilo.
8 ८ परमेश्वराची वाणी वाळवंटाला कंपित करते कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या वाणीने हादरते.
Ilizwi leNkosi lizamazamisa inkangala, iNkosi izamazamisa inkangala yeKadeshi.
9 ९ परमेश्वराची वाणी हरणाला प्रसवयास लावते आणि अरण्य पर्णहीन करते. पण त्याच्या मंदिरात सर्व “महिमा!” गातात
Ilizwi leNkosi lizalisa izimpala, lihlubule amahlathi; lethempelini layo konke kuthi: Udumo.
10 १० महापुरावर परमेश्वर राजा बसला आहे, आणि परमेश्वरच सर्वकाळचा राजा म्हणून बसला आहे.
UJehova uhlezi phezu kukazamcolo, yebo, uJehova uhlezi eyiNkosi kuze kube nininini.
11 ११ परमेश्वर त्याच्या लोकांना सामर्थ्य देतो, परमेश्वर त्याच्या लोकांना शांतीने आशीर्वादित करतो.
INkosi izanika abantu bayo amandla; iNkosi ibusise abantu bayo ngokuthula.