< स्तोत्रसंहिता 28 >

1 दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझ्या खडका, मी तुलाच आरोळी करतो. मला दुर्लक्षित करू नको. जर तू मला उत्तर दिले नाहीस तर जे थडग्यात जातात त्यांसारखा मी होईन.
Yahwe, ninalia; mwamba wangu, usinipuuze. Ikiwa haunijibu, nitaungana na wale waendao chini kaburini.
2 जेव्हा मी तुला मदतीसाठी हाक मारतो, जेव्हा मी आपले हात तुझ्या पवित्र ठिकाणाकडे उंचावतो, तेव्हा माझी विनवणी ऐक.
Sikia kilio cha kusihi kwangu pale niitapo msaada kutoka kwako, niinuapo mikono yangu mbele ya mahali patakatifu zaidi!
3 जे अन्याय करतात त्या दुष्टांबरोबर मला फरफटू नकोस. जे त्यांच्या शेजाऱ्यांसोबत शांतीने बोलतात, परंतु त्यांच्या हृदयात मात्र वाईट असते.
Usiniburute pamoja na waovu, wale wafanyao uovu, waongeao amani na majirani zao lakini mioyoni mwao mna uovu.
4 त्यांच्या कृतीप्रमाणे आणि त्यांच्या दुष्टकृत्यांच्या प्रमाणे त्यांची परत फेड कर.
Uwape kulingana na sitahili ya matendo yao na uwalipe kulingana na madai ya maovu yao, uwalipe kwa ajili ya kazi ya mikono yao na uwape kile wanachostahili.
5 कारण त्यांना परमेश्वराचे मार्ग किंवा त्याच्या हातची कृत्ये समजत नाहीत. तो त्यांना मोडेल आणि पुन्हा बांधणार नाही.
Kwa sababu hawayaelewi matendo ya Yahwe wala kazi ya mikono yake, atawakanyaga kanyaga chini na hata wajenga tena wao.
6 परमेश्वराची स्तुती असो, कारण त्याने माझ्या विनवणीचा आवाज ऐकला.
Abarikiwe Yahwe kwa sababu yeye amesikia sauti ya kusihi kwangu!
7 परमेश्वर माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहे. माझे हृदय त्याच्यावर विश्वास ठेवते आणि मला मदत करण्यात आली आहे. यास्तव माझे हृदय मोठा हर्ष करते. आणि मी त्याची स्तुती गीत गाऊन करीन.
Yahwe ni nguvu yangu na ngao yangu; moyo wangu wa humwamini yeye, na ninasaidiwa. Kwa hiyo moyo wangu hufurahia sana, nami nitamsifu yeye kwa kuimba.
8 परमेश्वर त्याच्या लोकांसाठी बल असा आहे, आणि तो त्याच्या अभिषिक्ताला तारणाचा आश्रय आहे.
Yahwe ni nguvu ya watu wake, naye ni mkombozi salama wa wapakwa mafuta wake.
9 तुझ्या लोकांस वाचव आणि तुझ्या वतनाला आशीर्वाद दे. त्यांचा मेंढपाळ हो आणि त्यांना सर्वकाळ वाट दाखव व त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे.
Uwaokoe watu wako na uwabariki warithi wako. Uwe mchungaji wao na uwabebe milele.

< स्तोत्रसंहिता 28 >