< स्तोत्रसंहिता 26 >

1 दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझा न्याय कर. कारण मी प्रामाणिकपणाने चाललो आहे. मी परमेश्वरावर न डगमगता विश्वास ठेवला आहे.
Sudi mi, Gospode, jer u prostoti svojoj hodim i u Gospoda se uzdam; neæu se pokolebati.
2 हे परमेश्वरा, मला पारख आणि माझे परिक्षण कर. माझ्ये हृदय आणि आतील मन निरखून पाहा.
Ispitaj me, Gospode, i iskušaj me; pretopi što je u meni i srce moje.
3 कारण तुझी प्रेमदया सदैव माझ्या डोळ्यांपुढे आहे, आणि मी तुझ्या सत्यात चाललो आहे.
Jer je milost tvoja pred oèima mojima, i hodim u istini tvojoj.
4 कपटी लोकांबरोबर मी सहयोगी झालो नाही, किंवा मी अप्रामाणिक लोकांत मिसळलो नाही.
Ne sjedim s bezumnicima, i s lukavima se ne miješam.
5 मी त्या दुष्टांच्या सभेचा तिरस्कार करतो. आणि मी दुष्टांसोबत राहत नाही.
Nenavidim društvo bezakonièko, i s bezbožnicima ne sjedim.
6 मी आपले हात निर्दोषतेने धुईन, आणि परमेश्वरा मी तुझ्या वेदीकडे वळीन.
Umivam pravdom ruke svoje, i idem oko žrtvenika tvojega, Gospode,
7 अशासाठी की, मी तुझी स्तुती मोठ्याने करावी आणि तू केलेल्या आश्चर्याची कृत्ये सांगावी.
Da razglašujem hvalu tvoju i kazujem sva èudesa tvoja.
8 परमेश्वरा, तुझे राहण्याचे घर आणि तुझे गौरव जिथे असते, ते घर मला आवडते.
Gospode! omilio mi je stan doma tvojega, i mjesto naselja slave tvoje.
9 पाप्यांसोबत किंवा रक्तपात करणाऱ्यांसोबत माझा प्राण काढून घेऊ नकोस.
Nemoj duše moje pogubiti, ni života mojega s krvopilcima,
10 १० त्यांच्या हातात कट आहे, आणि त्यांचा उजवा हात लाच घेण्याने भरला आहे.
Kojima je zloèinstvo u rukama, i kojima je desnica puna mita.
11 ११ पण मी तर प्रामाणिकपणाने वागेन, माझ्यावर दया कर आणि मला तार.
A ja hodim u prostoti svojoj, izbavi me, i smiluj se na me.
12 १२ माझा पाय सपाट ठिकाणी उभा आहे, सभेमध्ये मी परमेश्वराची स्तुती करीन.
Noga moja stoji na pravom putu; na skupštinama æu blagosiljati Gospoda.

< स्तोत्रसंहिता 26 >