< स्तोत्रसंहिता 26 >
1 १ दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझा न्याय कर. कारण मी प्रामाणिकपणाने चाललो आहे. मी परमेश्वरावर न डगमगता विश्वास ठेवला आहे.
psalmus David iudica me Domine quoniam ego in innocentia mea ingressus sum et in Domino sperans non infirmabor
2 २ हे परमेश्वरा, मला पारख आणि माझे परिक्षण कर. माझ्ये हृदय आणि आतील मन निरखून पाहा.
proba me Domine et tempta me ure renes meos et cor meum
3 ३ कारण तुझी प्रेमदया सदैव माझ्या डोळ्यांपुढे आहे, आणि मी तुझ्या सत्यात चाललो आहे.
quoniam misericordia tua ante oculos meos est et conplacui in veritate tua
4 ४ कपटी लोकांबरोबर मी सहयोगी झालो नाही, किंवा मी अप्रामाणिक लोकांत मिसळलो नाही.
non sedi cum concilio vanitatis et cum iniqua gerentibus non introibo
5 ५ मी त्या दुष्टांच्या सभेचा तिरस्कार करतो. आणि मी दुष्टांसोबत राहत नाही.
odivi ecclesiam malignantium et cum impiis non sedebo
6 ६ मी आपले हात निर्दोषतेने धुईन, आणि परमेश्वरा मी तुझ्या वेदीकडे वळीन.
lavabo inter innocentes manus meas et circumdabo altare tuum Domine
7 ७ अशासाठी की, मी तुझी स्तुती मोठ्याने करावी आणि तू केलेल्या आश्चर्याची कृत्ये सांगावी.
ut audiam vocem laudis et enarrem universa mirabilia tua
8 ८ परमेश्वरा, तुझे राहण्याचे घर आणि तुझे गौरव जिथे असते, ते घर मला आवडते.
Domine dilexi decorem domus tuae et locum habitationis gloriae tuae
9 ९ पाप्यांसोबत किंवा रक्तपात करणाऱ्यांसोबत माझा प्राण काढून घेऊ नकोस.
ne perdas cum impiis animam meam et cum viris sanguinum vitam meam
10 १० त्यांच्या हातात कट आहे, आणि त्यांचा उजवा हात लाच घेण्याने भरला आहे.
in quorum manibus iniquitates sunt dextera eorum repleta est muneribus
11 ११ पण मी तर प्रामाणिकपणाने वागेन, माझ्यावर दया कर आणि मला तार.
ego autem in innocentia mea ingressus sum redime me et miserere mei
12 १२ माझा पाय सपाट ठिकाणी उभा आहे, सभेमध्ये मी परमेश्वराची स्तुती करीन.
pes meus stetit in directo in ecclesiis benedicam te Domine