< स्तोत्रसंहिता 25 >
1 १ दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.
Kwako, Yahwe, nayainua maisha yangu!
2 २ माझ्या देवा, तुझ्यात माझा विश्वास आहे. मला निराश होऊ देऊ नको, माझे शत्रू माझ्यावर हर्ष न करोत.
Mungu wangu, ninaamini katika wewe. Usiniache niaibishwe; usiwaache maadui zangu wafurahie ushindi wao kwangu.
3 ३ तुझ्या विश्वासणाऱ्याची कधी निराशा होत नाही. परंतु जे कारण नसताना विश्वासघात करतात, ते लाजवले जातील.
Asiaibishwe mtu yeyote anaye kutumaini bali waaibishwe wale watendao hila bila sababu!
4 ४ हे परमेश्वरा तुझे मार्ग मला कळव, मला तुझे मार्ग शिकव.
Unijulishe njia zako, Yahwe; unifundishe njia zako.
5 ५ तू आपल्या सत्यात मला मार्ग दाखव आणि मला शिकव. कारण तू माझा तारणारा देव आहेस मी रोज तुझी वाट पाहतो.
Uniongoze kwenye kweli yako na unifundishe, kwa kuwa wewe ni Mungu wa wokovu wangu; ninakutumainia wewe siku zote za maisha yangu.
6 ६ हे परमेश्वरा, तुझ्या दयाळू कृत्यांची आणि प्रेमदयेची आठवण कर.
Kumbuka, Yahwe, matendo yako ya huruma na uaminifu wa agano lako; kwa kuwa vimekuwapo siku zote.
7 ७ हे परमेश्वरा, माझे तरुणपणाचे पाप आणि माझा बंडखोरपणा आठवू नको. तू आपल्या प्रेमदयेला अनुसरून आपल्या चांगुलपणामुळे माझी आठवण कर.
Usizikumbuke dhambi za ujana wangu wala uasi wangu; Uniweke akilini mwako pamoja na uaminifu wa agano kwa zababu ya uzuri wa wako, Yahwe!
8 ८ परमेश्वर चांगला आणि प्रामाणिक आहे. यास्तव तो पाप्यांस मार्ग शिकवतो.
Yahwe ni mzuri na mwenye haki; kwa hiyo yeye huwafundisha njia mwenye dhambi.
9 ९ तो नम्र जणांस न्यायाने मार्गदर्शन करतो. आणि दीनांना आपला मार्ग शिकवीतो.
Yeye huwaelekeza wanyenyekevu kwa kile kilicho sahihi na yeye huwafundisha wao njia yake.
10 १० जे त्याचे करार आणि वचने पाळतात त्यांच्यासाठी परमेश्वराचे मार्ग प्रेमदया व विश्वासयोग्य आहेत.
Njia zote za Yahwe ni za upendo wa kudumu na niaminifu kwa wote wanao tunza agano na maagizo ya amri zake.
11 ११ परमेश्वरा, तुझ्या नामास्तव, माझ्या अपराधांची क्षमा कर, कारण ते खूप आहेत.
Kwa ajili ya jina lako, Yahwe, unisamehe dhambi zangu, kwa kuwa ni nyingi mno.
12 १२ परमेश्वराचे भय धरतो असा मनुष्य कोण आहे? प्रभू त्यास सूचना देईल, की त्याने कोणते मार्ग निवडावे.
Ni nani ambaye anamuogopa Yahwe? Bwana atamfundisha yeye katika njia ambayo anapaswa kuichagua.
13 १३ त्याचे जीवन चांगुलपणात जाईल, आणि त्याची संतान भूमीचे वतन पावतील.
Maisha yake yataenenda katika uzuri; na uzao wake utairithi nchi.
14 १४ परमेश्वराचे सत्य त्याचे अनुकरण करणाऱ्यांबरोबर असते. आणि तो त्याचे करार कळवतो.
Urafiki wa Yahwe ni kwa ajili ya wale wanao mheshimu yeye, naye hulifanya agano lake lijulikane kwao.
15 १५ मी नेहमी परमेश्वराकडे आपली दृष्टी लावतो. कारण तो माझे पाय जाळ्यातून मुक्त करतो.
Siku zote macho yangu yanamtazama Yahwe, kwa kuwa yeye ataifungua miguu yangu kwenye nyavu.
16 १६ परमेश्वरा माझ्याकडे फिर आणि माझ्यावर दया कर. कारण मी एकटा आणि पीडलेला आहे.
Unigeukie mimi na unihurumie; kwa maana niko peke yangu na niliye matesoni.
17 १७ माझ्या हृदयाचा त्रास वाढला आहे, संकटातून मला तू काढ.
Maumivu ya moyo wangu yameongezeka; uniondoe katika dhiki hii!
18 १८ परमेश्वरा, माझे दु: ख आणि कष्ट बघ, माझ्या सर्व पापांची क्षमा कर.
Tazama mateso yangu na taabu yangu; unisamehe dhambi zangu zote.
19 १९ माझ्या सर्व शत्रूंकडे पाहा, कारण ते पुष्कळ आहेत. ते माझा कठोरपणे तिरस्कार करतात.
Ona maadui zangu, kwa maana ni wengi; wananichukia kwa chuki ya kikatili.
20 २० देवा, माझे रक्षण कर आणि मला वाचव. माझा तुझ्यावर विश्वास आहे, तेव्हा माझी निराशा करू नकोस.
Uyalinde maisha yangu na uniokoe; usiniache niaibishwe, Kwa kuwa kwako nakimbilia usalama!
21 २१ तुझा प्रामाणिकपणा आणि सरळपणा माझे रक्षण करोत. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे.
Uadilifu na unyofu vinihifadhi, kwa kuwa nina kutumainia wewe.
22 २२ देवा, इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या सर्व त्रासांपासून सोडव.
Mungu, uiokoe Israeli, na shida yake yote!