< स्तोत्रसंहिता 23 >
1 १ दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही.
Псалом Давидів.
2 २ तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
на пасови́ськах зелених осе́лить мене́, на тихую воду мене запрова́дить!
3 ३ तो माझा जीव ताजा-तवाना करतो, तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो.
Він душу мою відживля́є, прова́дить мене́ ради Йме́ння Свого́ по стежка́х справедливости.
4 ४ मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी, मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात.
Коли я піду́ хоча б навіть долиною смертної те́мряви, то не буду боятися злого, бо Ти при мені, — Твоє же́зло й Твій по́сох — вони мене вті́шать!
5 ५ तू माझ्या शत्रूंच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतोस, तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहे. माझा प्याला भरुन वाहत आहे.
Ти передо мною трапе́зу згото́вив при моїх ворогах, мою го́лову Ти намасти́в був оливою, моя чаша — то на́дмір пиття́!
6 ६ खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील, आणि परमेश्वराच्या घरात मी अनंतकाळ राहीन.
Ті́льки добро́ й милосердя мене супрово́дити будуть по всі дні мого життя, а я пробува́тиму в домі Господньому довгі часи́!