< स्तोत्रसंहिता 21 >
1 १ मुख्य गायकासाठी, दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यात राजा हर्ष करतो! तू दिलेल्या तारणात तो किती मोठ्या मानाने आनंद करतो!
Načelniku godbe; psalm Davidov. Gospod, moči tvoje veseli se kralj, in blaginje tvoje kako se silno raduje!
2 २ त्याच्या हृदयाची इच्छा तू पूर्ण केली आहेस. आणि त्याच्या ओठांची विनंती तू अमान्य केली नाही.
Željo srca njegovega mu daješ, in kar so ustne njegove govorile, ne odrékaš.
3 ३ कारण तो तुजकडे मोठे आशीर्वाद आणतो. तू त्याच्या डोक्यावर शुद्ध सोन्याचा मुकुट चढवतो.
Dà, prehitevaš ga z blagodari, na glavo njegovo pokladaš venec iz zlata prečistega.
4 ४ त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू त्यास न संपणारे आयुष्य दिलेस.
Življenja te je prosil, dal si mu; tudi dnî dolgost na vedno večne čase.
5 ५ तुझ्या विजयामुळे त्याचे गौरव थोर आहे. तू त्यास ऐश्वर्य व वैभव बहाल केलेस.
Velika je slava njegova po blaginji tvoji; díko in veličastvo si položil nanj.
6 ६ कारण तू त्यास सर्वकाळचा आशीर्वाद दिला आहे; तू तुझ्या समक्षतेत त्यास हर्षाने आनंदित करतोस.
Ker pripravil si mu blagoslove na vekomaj; razjasnil ga z radostjo od svojega obličja.
7 ७ कारण राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे, परात्पराच्या प्रेमदयेने तो कधीही ढळणार नाही.
Ker kralj sam upa v Gospoda; zato v zaupanji na milost Najvišjega ne omahne.
8 ८ तुझा हात तुझ्या सर्व शत्रूला पकडणार. तुझा उजवा हात जे तुझा हेवा करतात त्यांना पकडेल.
Z roko svojo dosežeš vse neprijatelje svoje; z desnico svojo dosežeš vse svoje sovražnike.
9 ९ तुझ्या क्रोधसमयी तू त्यांना जळत्या भट्टीत जाळून टाकशील. परमेश्वर त्याच्या क्रोधसमयी त्यांचा नाश करणार, आणि त्याचा अग्नी त्यांना खाऊन टाकणार.
Narediš, da so kakor peč ognjena ob času srditega obličja tvojega; Gospod jih pogoltne v jezi svoji, kakor da jih ogenj uniči.
10 १० तू त्यांच्या संतानांचा या पृथ्वीवरुन नाश करशील.
Sad njih pokončaš sè zemlje, in njih seme izmed sinov človeških.
11 ११ कारण, त्या लोकांनी तुझ्याविरूद्ध वाईट योजिले, त्यांनी अशी योजना आखली जी त्यांच्याने यशस्वी झाली नाही.
Ker nameravali so ti hudo; izmišljali so naklep: ne morejo!
12 १२ कारण तू त्यांना त्यांची पाठ दाखवावयास लावशील. तू आपले धनुष्य त्यांच्यावर चालवण्यास सज्ज करशील.
Ker staviš jih kakor gomilo; na strune svoje pokladaš pušice ter jih streljaš proti njih obličjem.
13 १३ परमेश्वरा तू आपल्या नावाने उंचावला जावो, आम्ही गाऊ व तुझ्या सामर्थ्याची स्तुती करू.
Dvigni se, Gospod, v moči svoji; pojmo in prepevajmo o hrabrosti tvoji.