< स्तोत्रसंहिता 20 >
1 १ मुख्य गायकासाठी, दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर तुला संकटात साहाय्य करो, याकोबाच्या देवाचे नाव तुझे संरक्षण करो.
Davidin Psalmi, edelläveisaajalle. Herra kuulkoon sinua hädässäs, Jakobin Jumalan nimi sinua varjelkoon!
2 २ देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हास मदत पाठवो. तो तुम्हास सियोनातून साहाय्य करो.
Hän lähettäköön sinulle apua pyhästä ja Zionista sinua vahvistakoon!
3 ३ तो तुझ्या सर्व अर्पणांची आठवण ठेवो, आणि तुझे होमार्पण यज्ञ मान्य करो.
Hän muistakoon kaikki ruokauhris, ja sinun polttouhris olkoon lihavat, (Sela)
4 ४ तो तुझ्या हृदयाच्या इच्छा मान्य करो, आणि तुझ्या सर्व योजना पूर्ण करो.
Hän antakoon sinulle, mitä sinun sydämes anoo, ja päättäköön kaikki aivoitukses!
5 ५ तेव्हा आम्ही तुझ्या तारणात हर्ष करू. आणि आमच्या देवाच्या नावात झेंडे उभारू. परमेश्वर तुझ्या सर्व विनंत्या पूर्ण करो.
Me kerskaamme sinun avustas, ja meidän Jumalamme nimessä me ylennämme lippumme: Herra täyttäköön kaikki sinun rukoukses!
6 ६ परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो, हे मी जाणले आहे. त्याच्या तारण करणाऱ्या उजव्या हाताच्या सामर्थ्याने, तो त्याच्या पवित्र स्वर्गातून त्यास उत्तर देईल.
Nyt minä tunnen Herran voideltuansa auttavan, ja häntä kuulevan pyhästä taivaastansa: hänen oikia kätensä auttaa voimallisesti.
7 ७ काही त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात, तर काही घोड्यांवर, परंतु आम्ही आमच्या परमेश्वर देवाला हाक मारू.
Nämät uskaltavat rattaisiin ja oreihin; mutta me muistamme Herran Jumalamme nimeä.
8 ८ ते खाली आणले गेले आणि पडले, परंतु आम्ही उठू आणि ताठ उभे राहू!
He ovat kukistetut ja langenneet; mutta me nousemme ja pystyällä seisomme.
9 ९ हे परमेश्वरा तारण कर, आम्ही आरोळी करू त्या दिवशी राजा आम्हांला उत्तर देवो.
Auta Herra! Kuningas meitä kuulkaan, kuin me huudamme.