< स्तोत्रसंहिता 2 >

1 राष्ट्रे का बंडखोर झाली आहेत, आणि लोक व्यर्थच का कट रचत आहेत?
¿Por qué se amotinan las gentes, y los pueblos piensan vanidad?
2 पृथ्वीचे राजे परमेश्वराविरूद्ध व त्याच्या अभिषिक्त्याविरूद्ध एकत्र उभे झाले आहेत, आणि राज्यकर्ते एकत्र मिळून कट रचत आहेत, ते म्हणतात.
Estarán los reyes de la tierra, y príncipes consultarán en uno contra Jehová, y contra su ungido, diciendo:
3 चला, आपण त्यांच्या बेड्या तोडून टाकू, जे त्यांनी आपणावर लादल्या होत्या. आणि त्यांचे साखळदंड फेकून देऊ.
Rompamos sus coyundas: y echemos de nosotros sus cuerdas.
4 परंतु तो जो आकाशांत बसलेला आहे तो हसेल, प्रभू त्यांचा उपहास करेल.
El que mora en los cielos se reirá: el Señor se burlará de ellos.
5 तेव्हा तो आपल्या रागात त्यांच्याशी बोलेल, आणि आपल्या संतापाने त्यांना घाबरे करील.
Entonces hablará a ellos con su furor, y con su ira los conturbará.
6 मी माझ्या पवित्र डोंगरावर, सीयोनावर, माझ्या राजास अभिषेक केला आहे.
Y yo te establecí mi rey sobre Sión, el monte de mi santidad.
7 मी परमेश्वराचा फर्मान घोषीत करीन, तो मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस.” या दिवशी मी तुझा पिता झालो आहे.
Yo recitaré el decreto. Jehová me dijo: Mi hijo eres tú: yo te engendré hoy.
8 मला माग, आणि मी तुला राष्ट्रे तुझे वतन आणि पृथ्वीच्या सीमा तुझ्या ताब्यात देईल.
Demándame, y yo daré las gentes por tu heredad, y por tu posesión los cabos de la tierra.
9 लोखंडी दंडाने तू त्यांना तोडशील, कुंभाराच्या भांड्यासारखा तू त्यांना फोडशील.
Quebrantarlos has con vara de hierro: como vaso de ollero los desmenuzarás.
10 १० म्हणून आता, अहो राजांनो, सावध व्हा; पृथ्वीच्या राज्यकर्त्यांनो, चूक दुरुस्त करा.
Y ahora reyes entendéd: admitid consejo jueces de la tierra.
11 ११ भय धरून परमेश्वराची स्तुती करा आणि थरथर कापून हर्ष करा.
Servíd a Jehová con temor: y alegráos con temblor.
12 १२ आणि तो तुमच्यावर रागावू नये, ह्यासाठी देवाच्या पुत्रास खरी निष्ठा द्या, म्हणजे तुम्ही मरणार नाही. कारण देवाचा क्रोध त्वरीत पेटेल. जे सर्व त्याच्याठायी आश्रय घेतात ते आशीर्वादीत आहेत.
Besád al hijo, porque no se enoje, y perezcáis en el camino: cuando se encendiere un poco su furor, bienaventurados todos los que confían en él.

< स्तोत्रसंहिता 2 >