< स्तोत्रसंहिता 2 >
1 १ राष्ट्रे का बंडखोर झाली आहेत, आणि लोक व्यर्थच का कट रचत आहेत?
Why this turmoil of nations, this futile plotting of peoples,
2 २ पृथ्वीचे राजे परमेश्वराविरूद्ध व त्याच्या अभिषिक्त्याविरूद्ध एकत्र उभे झाले आहेत, आणि राज्यकर्ते एकत्र मिळून कट रचत आहेत, ते म्हणतात.
with kings of the earth conspiring, and rulers consulting together, against the Lord and against his anointed,
3 ३ चला, आपण त्यांच्या बेड्या तोडून टाकू, जे त्यांनी आपणावर लादल्या होत्या. आणि त्यांचे साखळदंड फेकून देऊ.
to snap their bonds and fling their cords away?
4 ४ परंतु तो जो आकाशांत बसलेला आहे तो हसेल, प्रभू त्यांचा उपहास करेल.
He whose throne is in heaven laughs, the Lord mocks them.
5 ५ तेव्हा तो आपल्या रागात त्यांच्याशी बोलेल, आणि आपल्या संतापाने त्यांना घाबरे करील.
Then he speaks to them in his wrath, and in his hot anger confounds them.
6 ६ मी माझ्या पवित्र डोंगरावर, सीयोनावर, माझ्या राजास अभिषेक केला आहे.
“This my king is installed by me, on Zion my holy mountain.”
7 ७ मी परमेश्वराचा फर्मान घोषीत करीन, तो मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस.” या दिवशी मी तुझा पिता झालो आहे.
I will tell of the Lord’s decree. He said to me: “You are my son, this day I became your father.
8 ८ मला माग, आणि मी तुला राष्ट्रे तुझे वतन आणि पृथ्वीच्या सीमा तुझ्या ताब्यात देईल.
Only ask, and I make you the heir of the nations, and lord of the world to its utmost bounds.
9 ९ लोखंडी दंडाने तू त्यांना तोडशील, कुंभाराच्या भांड्यासारखा तू त्यांना फोडशील.
You will break them with sceptre of iron, shatter them like pottery.”
10 १० म्हणून आता, अहो राजांनो, सावध व्हा; पृथ्वीच्या राज्यकर्त्यांनो, चूक दुरुस्त करा.
So now, you kings, be wise: be warned, you rulers of earth.
11 ११ भय धरून परमेश्वराची स्तुती करा आणि थरथर कापून हर्ष करा.
Serve the Lord in awe, kiss his feet with trembling,
12 १२ आणि तो तुमच्यावर रागावू नये, ह्यासाठी देवाच्या पुत्रास खरी निष्ठा द्या, म्हणजे तुम्ही मरणार नाही. कारण देवाचा क्रोध त्वरीत पेटेल. जे सर्व त्याच्याठायी आश्रय घेतात ते आशीर्वादीत आहेत.
lest, angry, he hurl you to ruin; for soon will his fury blaze. Happy all who take refuge in him.