< स्तोत्रसंहिता 19 >
1 १ मुख्य गायकासाठी. दाविदाचे स्तोत्र. आकाश देवाचा गौरव जाहीर करते, आणि अंतराळ त्याच्या हातचे कृत्य दाखविते.
For the leader. A psalm of David. The heavens declare God’s glory, the sky tells what his hands have done.
2 २ दिवस दिवसाशी बोलतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.
Day tells it to day, night reveals it to night,
3 ३ संभाषण नाही, बोललेले शब्दही नाही, त्यांचा आवाजही ऐकू येत नाही.
without speaking, without words; without the sound of voices.
4 ४ तरी त्यांचे शब्द सर्व पृथ्वीभर जातात. आणि त्यांचे बोलणे जगाच्या शेवटापर्यंत जाते. त्याने सुर्यासाठी आकाशामध्ये मंडप उभारला आहे.
But through all the world their voice carries their words to the ends of the earth. He has pitched a tent for the sun in the sky,
5 ५ सूर्य नवऱ्या मुलासारखा आपल्या मांडवातून बाहेर येतो. आणि सामर्थ्यवान पुरुषाप्रमाणे तो आपली धाव धावण्यात आनंद करतो.
it comes out like a bridegroom from his bridal chamber, it joyfully runs its course like a hero.
6 ६ सूर्य एक क्षितीजापासून उदय होतो, आणि दुसऱ्या क्षितिजापर्यंत आकाशात पार जातो. त्याच्या उष्णतेपासून कोणाचीही सुटका होत नाही.
From one end of the heavens it rises, and round it runs to the other, and nothing hides from its heat.
7 ७ परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते जीवाला पुर्नजीवित करणारे आहे. परमेश्वराचे नियम विश्वसनीय आहेत, ज्यांना अनुभव नाही त्यांना शहाणपण देणारे आहे.
The law of the Lord is perfect, renewing life. The decrees of the Lord are trusty, making the simple wise.
8 ८ परमेश्वराच्या सूचना खऱ्या आहेत. जे हृदयाला हर्षीत करतात. परमेश्वराच्या कराराचे नियम शुद्ध आहेत, ते डोळे प्रकाशवनारे आहेत.
The behests of the Lord are right, rejoicing the heart. The command of the Lord is pure, giving light to the eyes.
9 ९ परमेश्वराची भीती शुद्ध आहे, ती सर्वकाळ टिकणारे आहे, परमेश्वराचे नियम खरे आहेत, आणि सर्व न्यायी आहेत.
The fear of the Lord is clean, it endures forever. The Lord’s judgments are true and right altogether.
10 १० ते सोन्यापेक्षा ही मौल्यवान आहेत. अती उत्तम सोन्यापेक्षाही ते शुद्ध आहेत. ते मधाच्या पोळ्यातून गळणाऱ्या, मधापेक्षाही गोड आहेत.
More precious are they than gold – than fine gold in plenty, and sweeter they are than honey, that drops from the comb.
11 ११ होय, त्याकडून तुझ्या सेवकाला चेतावनी मिळते. ते पाळण्याने उत्तम प्रतिफळ मिळते.
By them is your servant warned; who keeps them has rich reward.
12 १२ आपल्या स्वत: च्या चुका कोण ओळखू शकतो? माझ्या गुप्त दोषांची मला क्षमा कर.
Who can know their flaws? Absolve me from those I know not.
13 १३ तुझ्या सेवकाला जाणूनबुजून केलेल्या पापापासून राख; ती माझ्यावर राज्य न गाजवोत. तेव्हा मी परिपूर्ण होईल, आणि माझ्या पुष्कळ अपराधांपासून निर्दोष राहीन.
Keep your servant from wilful sins – from falling under their sway: then blameless and clear will I be from great offence.
14 १४ माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या हृदयाचे विचार तुझ्यासमोर मान्य असोत. परमेश्वरा, तू माझा खडक आहेस, मला तारणारा तूच आहेस.
May the words of my mouth and the thoughts of my heart be pleasing to you, Lord, my rock and redeemer.