< स्तोत्रसंहिता 16 >
1 १ दाविदाचे मिक्ताम (सुवर्णगीत) हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझ्यात आश्रय घेतला आहे.
大卫的金诗。 神啊,求你保佑我, 因为我投靠你。
2 २ मी परमेश्वरास म्हणालो, “हे परमेश्वरा, तू माझा प्रभू आहेस, माझ्यामध्ये असलेला चांगुलपणा तुझ्याशिवाय काहीच नाही.”
我的心哪,你曾对耶和华说:你是我的主; 我的好处不在你以外。
3 ३ पृथ्वीवर जे पवित्र (संत) आहेत, ते थोर जन आहेत. त्यांच्यामध्ये माझा सर्व आनंद आहे.
论到世上的圣民,他们又美又善, 是我最喜悦的。
4 ४ जे दुसऱ्या देवाला शोधतात, त्यांची दु: खे वाढवली जातील. त्यांच्या देवाला मी रक्ताची पेयार्पणे ओतणार नाही. किंवा त्यांचे नावसुद्धा आपल्या ओठाने घेणार नाही.
以别神代替耶和华的, 他们的愁苦必加增; 他们所浇奠的血我不献上; 我嘴唇也不提别神的名号。
5 ५ परमेश्वरा, तू माझा निवडलेला भाग आणि माझा प्याला आहे. माझा वाटा तुच धरून ठेवतोस.
耶和华是我的产业, 是我杯中的分; 我所得的,你为我持守。
6 ६ माझ्या करिता सिमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत. खचित माझे वतन सुंदर आहे.
用绳量给我的地界,坐落在佳美之处; 我的产业实在美好。
7 ७ मी परमेश्वराची स्तुती करतो, ज्याने मला मार्गदर्शन केले आहे, रात्रीच्या वेळी माझे मन मला शिकविते.
我必称颂那指教我的耶和华; 我的心肠在夜间也警戒我。
8 ८ मी परमेश्वरास नेहमी माझ्यासमोर ठेवतो म्हणून मी त्याच्या उजव्या हातातून कधीही ढळणार नाही.
我将耶和华常摆在我面前, 因他在我右边,我便不致摇动。
9 ९ त्यामुळे माझे हृदय आनंदी आहे; माझे मन त्यास उंच करते. खचित माझा देह सुद्धा सुरक्षित राहतो.
因此,我的心欢喜,我的灵快乐; 我的肉身也要安然居住。
10 १० कारण तू माझ्या जीवाला मृतलोकांत राहू देणार नाही, ज्याच्याजवळ तुझी प्रेमदया आहे, त्यास तू अधोलोक पाहू देणार नाहीस. (Sheol )
因为你必不将我的灵魂撇在阴间, 也不叫你的圣者见朽坏。 (Sheol )
11 ११ तू मला जीवनाचा मार्ग शिकवला, तुझ्या उपस्थितीत विपुल हर्ष आहे, तुझ्या उजव्या हातात सुख सर्वकाळ आहेत.
你必将生命的道路指示我。 在你面前有满足的喜乐; 在你右手中有永远的福乐。