< स्तोत्रसंहिता 150 >
1 १ परमेश्वराची स्तुती करा. देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा.
Aleluja! Hvalite Boga, mogočnega o svetosti njegovi; hvalite ga v veličastva njegovega gradu.
2 २ त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा; त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा.
Hvalite ga o obili mogočnosti njegovi, hvalite ga po velikem veličastvu njegovem.
3 ३ शिंग वाजवून त्याची स्तुती करा; सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा.
Hvalite ga s trombe glasom; hvalite ga z brenkljami in strunami.
4 ४ डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा; तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा.
Hvalite ga z bobnom in piščaljo, hvalite ga z orgljami.
5 ५ जोराने झांज वाजवून त्याची स्तुती करा; उंच आवाजाने झांज वाजवून त्याचे स्तुती करा.
Hvalite ga s cimbali donečimi, hvalite ga sè sistri.
6 ६ प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो. परमेश्वराची स्तुती करा.
Vsaka duša hvali naj Gospoda! Aleluja!