< स्तोत्रसंहिता 150 >

1 परमेश्वराची स्तुती करा. देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा.
הַ֥לְלוּ יָ֨הּ ׀ הַֽלְלוּ־אֵ֥ל בְּקָדְשֹׁ֑ו הֽ͏ַ֝לְל֗וּהוּ בִּרְקִ֥יעַ עֻזֹּֽו׃
2 त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा; त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा.
הַֽלְל֥וּהוּ בִגְבוּרֹתָ֑יו הֽ͏ַ֝לְל֗וּהוּ כְּרֹ֣ב גֻּדְלֹֽו׃
3 शिंग वाजवून त्याची स्तुती करा; सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा.
הַֽ֭לְלוּהוּ בְּתֵ֣קַע שֹׁופָ֑ר הַֽ֝לְל֗וּהוּ בְּנֵ֣בֶל וְכִנֹּֽור׃
4 डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा; तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा.
הַֽ֭לְלוּהוּ בְתֹ֣ף וּמָחֹ֑ול הַֽ֝לְל֗וּהוּ בְּמִנִּ֥ים וְעוּגָֽב׃
5 जोराने झांज वाजवून त्याची स्तुती करा; उंच आवाजाने झांज वाजवून त्याचे स्तुती करा.
הַֽלְל֥וּהוּ בְצִלְצְלֵי־שָׁ֑מַע הַֽ֝לְל֗וּהוּ בְּֽצִלְצְלֵ֥י תְרוּעָֽה׃
6 प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो. परमेश्वराची स्तुती करा.
כֹּ֣ל הַ֭נְּשָׁמָה תְּהַלֵּ֥ל יָ֗הּ הַֽלְלוּ־יָֽהּ׃

< स्तोत्रसंहिता 150 >