< स्तोत्रसंहिता 149 >
1 १ परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वरास नवे गीत गा; विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा.
Алілу́я!
2 २ इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो. सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत.
Хай Ізраїль радіє Творце́м своїм, хай Царем своїм тішаться діти Сіону!
3 ३ ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत; ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो.
Нехай славлять Ім'я́ Його та́нцем, нехай виграва́ють для Нього на бу́бні та гу́слах,
4 ४ कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे; तो दीनांना तारणाने गौरवितो.
бо знахо́дить Господь уподо́бу в наро́ді Своїм, прикраша́є покірних спасі́нням!
5 ५ भक्त विजयाने हर्षभरित होवोत; ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो.
Хай радіють у славі святі, хай співають на ло́жах своїх,
6 ६ देवाची स्तुती त्यांच्या मुखात असो, आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात असो.
просла́влення Бога — на їхніх уста́х, а меч обосі́чний — ув їхніх рука́х,
7 ७ यासाठी की त्यांनी राष्ट्रावर सूड उगवावा आणि लोकांस शिक्षा करावी.
щоб чинити між племе́нами по́мсту, між наро́дами — ка́ри,
8 ८ ते त्यांच्या राजांना साखळंदडाने आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्यांनी बांधतील.
щоб їхніх царів пов'язати кайда́нами, а їхніх вельмо́ж — ланцюга́ми,
9 ९ ते लिहून ठेवलेला जो न्याय आहे तो अंमलात आणतील. हा त्याच्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आदर आहे. परमेश्वराची स्तुती करा.
щоб між ними чини́ти суд написаний! Він — вели́чність для всіх богобі́йних! Алілу́я!