< स्तोत्रसंहिता 148 >

1 परमेश्वराची स्तुती करा. आकाशातून परमेश्वराची स्तुती करा; उंचामध्ये त्याची स्तुती करा.
Алілуя!
2 त्याच्या सर्व देवदूतांनो त्याची स्तुती करा; त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा.
Хваліте Його, всі Його Анголи́, хваліте Його, усі ві́йська Його́:
3 सूर्य व चंद्रहो त्याची स्तुती करा; तुम्ही सर्व चमकणाऱ्या ताऱ्यांनो, त्याची स्तुती करा.
Хваліте Його, сонце й місяцю, хваліте Його, усі зо́рі ясні́!
4 आकाशावरील आकाशांनो आणि आकाशावरील जलांनो त्याची स्तुती करा.
Хваліте Його, небеса́ із небе́с, та води, що над небеса́ми!
5 ती परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत. कारण त्याने आज्ञा केली आणि त्यांची निर्मिती झाली.
Нехай Господа хвалять вони, бо Він наказа́в, — і створились вони,
6 त्याने ती सर्वकाळासाठी व कायम स्थापली; त्याने नियम ठरवून दिला तो कधीही बदलणार नाही.
Він їх поставив на вічні віки́, дав нака́за, — і не пересту́плять його!
7 पृथ्वीवरून परमेश्वराची स्तुती करा. तुम्ही समुद्रातील प्राण्यांनो आणि सर्व महासागरांनो,
Хваліть Господа та́кож з землі: риби великі й безо́дні усі,
8 अग्नी आणि गारा, बर्फ आणि धुके, त्याचे वचन पूर्ण करणारे सर्व वादळी वारा,
огонь та град, сніг та туман, вітер бурхли́вий, що виконує слово Його́,
9 पर्वत आणि सर्व टेकड्या, फळझाडे व सर्व गंधसरू,
го́ри та па́гірки всі, плідне дерево та всі кедри́ни,
10 १० जंगली आणि पाळीव प्राणी, सरपटणारे प्राणी आणि उडणारे पक्षी,
звірина́ й вся худо́ба, все плазу́юче та пта́ство крилате,
11 ११ पृथ्वीवरचे राजे आणि सर्व राष्ट्रे, अधिपती आणि पृथ्वीतले सर्व न्यायाधीश,
зе́мні царі й всі наро́ди, князі та всі су́дді землі,
12 १२ तरुण पुरुष आणि तरुण स्रिया, वृद्ध आणि मुले दोन्ही,
юнаки́ та дівиці, старі ра́зом із ді́тьми, —
13 १३ ही सर्व परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत, कारण केवळ त्याचेच नाव उंचावलेले आहे; आणि त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशाच्या वर पसरविले आहे.
нехай усі хвалять Господнє Ім'я́, бо Його́ тільки Йме́ння звели́чилось, вели́чність Його на землі й небеса́х!
14 १४ त्याने आपल्या लोकांचे शिंग उंचाविले आहे; कारण तो आपल्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याच्याजवळ असलेल्या इस्राएलाच्या लोकांस स्तुतीपात्र आहे. परमेश्वराची स्तुती करा.
Він рога народу Своє́му підні́с! Слава всім богобійним Його́, ді́тям Ізра́їлевим, наро́дові, що до Нього близьки́й! Алілуя!

< स्तोत्रसंहिता 148 >