< स्तोत्रसंहिता 148 >
1 १ परमेश्वराची स्तुती करा. आकाशातून परमेश्वराची स्तुती करा; उंचामध्ये त्याची स्तुती करा.
你們要讚美耶和華! 從天上讚美耶和華, 在高處讚美他!
2 २ त्याच्या सर्व देवदूतांनो त्याची स्तुती करा; त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा.
他的眾使者都要讚美他! 他的諸軍都要讚美他!
3 ३ सूर्य व चंद्रहो त्याची स्तुती करा; तुम्ही सर्व चमकणाऱ्या ताऱ्यांनो, त्याची स्तुती करा.
日頭月亮,你們要讚美他! 放光的星宿,你們都要讚美他!
4 ४ आकाशावरील आकाशांनो आणि आकाशावरील जलांनो त्याची स्तुती करा.
天上的天和天上的水, 你們都要讚美他!
5 ५ ती परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत. कारण त्याने आज्ञा केली आणि त्यांची निर्मिती झाली.
願這些都讚美耶和華的名! 因他一吩咐便都造成。
6 ६ त्याने ती सर्वकाळासाठी व कायम स्थापली; त्याने नियम ठरवून दिला तो कधीही बदलणार नाही.
他將這些立定,直到永永遠遠; 他定了命,不能廢去。
7 ७ पृथ्वीवरून परमेश्वराची स्तुती करा. तुम्ही समुद्रातील प्राण्यांनो आणि सर्व महासागरांनो,
所有在地上的, 大魚和一切深洋,
8 ८ अग्नी आणि गारा, बर्फ आणि धुके, त्याचे वचन पूर्ण करणारे सर्व वादळी वारा,
火與冰雹,雪和霧氣, 成就他命的狂風,
9 ९ पर्वत आणि सर्व टेकड्या, फळझाडे व सर्व गंधसरू,
大山和小山, 結果的樹木和一切香柏樹,
10 १० जंगली आणि पाळीव प्राणी, सरपटणारे प्राणी आणि उडणारे पक्षी,
野獸和一切牲畜, 昆蟲和飛鳥,
11 ११ पृथ्वीवरचे राजे आणि सर्व राष्ट्रे, अधिपती आणि पृथ्वीतले सर्व न्यायाधीश,
世上的君王和萬民, 首領和世上一切審判官,
12 १२ तरुण पुरुष आणि तरुण स्रिया, वृद्ध आणि मुले दोन्ही,
少年人和處女, 老年人和孩童, 都當讚美耶和華!
13 १३ ही सर्व परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत, कारण केवळ त्याचेच नाव उंचावलेले आहे; आणि त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशाच्या वर पसरविले आहे.
願這些都讚美耶和華的名! 因為獨有他的名被尊崇; 他的榮耀在天地之上。
14 १४ त्याने आपल्या लोकांचे शिंग उंचाविले आहे; कारण तो आपल्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याच्याजवळ असलेल्या इस्राएलाच्या लोकांस स्तुतीपात्र आहे. परमेश्वराची स्तुती करा.
他將他百姓的角高舉, 因此他一切聖民以色列人, 就是與他相近的百姓,都讚美他! 你們要讚美耶和華!