< स्तोत्रसंहिता 147 >
1 १ परमेश्वराची स्तुती करा, कारण आमच्या देवाची स्तुती गाणे चांगले आहे; ते आनंददायक आहे व स्तुती करणे उचित आहे.
Alleluia. Laudate Dominum quoniam bonus est psalmus: Deo nostro sit iucunda, decoraque laudatio.
2 २ परमेश्वर यरूशलेम पुन्हा बांधतो; तो इस्राएलाच्या विखुरलेल्या लोकांस एकत्र करतो.
Aedificans Ierusalem Dominus: dispersiones Israelis congregabit.
3 ३ तो भग्नहृदयी जनांना बरे करतो, आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो.
Qui sanat contritos corde: et alligat contritiones eorum.
4 ४ तो ताऱ्यांची मोजणी करतो; तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो.
Qui numerat multitudinem stellarum: et omnibus eis nomina vocat.
5 ५ आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे; त्याची बुद्धी मोजू शकत नाही.
Magnus Dominus noster, et magna virtus eius: et sapientiae eius non est numerus.
6 ६ परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो; तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो.
Suscipiens mansuetos Dominus: humilians autem peccatores usque ad terram.
7 ७ गाणे गाऊन परमेश्वराची उपकारस्तुती करा. वीणेवर आमच्या देवाचे स्तुतीगान करा.
Praecinite Domino in confessione: psallite Deo nostro in cithara.
8 ८ तो ढगांनी आकाश झाकून टाकतो, आणि पृथ्वीसाठी पाऊस तयार करतो, तो डोंगरावर गवत उगवतो.
Qui operit caelum nubibus: et parat terrae pluviam. Qui producit in montibus foenum: et herbam servituti hominum.
9 ९ तो प्राण्यांना आणि जेव्हा कावळ्यांची पिल्ले कावकाव करतात त्यांना अन्न देतो.
Qui dat iumentis escam ipsorum: et pullis corvorum invocantibus eum.
10 १० घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही; मनुष्याच्या शक्तीमान पायांत तो आनंद मानत नाही.
Non in fortitudine equi voluntatem habebit: nec in tibiis viri beneplacitum erit ei.
11 ११ जे परमेश्वराचा आदर करतात, जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो.
Beneplacitum est Domino super timentes eum: et in eis, qui sperant super misericordia eius.
12 १२ हे यरूशलेमे, परमेश्वराची स्तुती कर; हे सियोने तू आपल्या देवाची स्तुती कर.
Alleluia. Lauda Ierusalem Dominum: lauda Deum tuum Sion.
13 १३ कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत; त्याने तुझ्यामध्ये तुझी लेकरे आशीर्वादित केली आहेत.
Quoniam confortavit seras portarum tuarum: benedixit filiis tuis in te.
14 १४ तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो; तो तुला उत्कृष्ट गव्हाने तृप्त करतो.
Qui posuit fines tuos pacem: et adipe frumenti satiat te.
15 १५ तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो.
Qui emittit eloquium suum terrae: velociter currit sermo eius.
16 १६ तो लोकरीसारखे बर्फ पसरतो; तो राखेसारखे दवाचे कण विखरतो.
Qui dat nivem sicut lanam: nebulam sicut cinerem spargit,
17 १७ तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो; त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल?
Mittit crystallum suam sicut buccellas: ante faciem frigoris eius quis sustinebit?
18 १८ तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो; तो आपला वारा वाहवितो व पाणी वाहू लागते.
Emittet verbum suum, et liquefaciet ea: flabit spiritus eius, et fluent aquae.
19 १९ त्याने याकोबाला आपले वचन, इस्राएलाला आपले नियम व निर्णय सांगितले.
Qui annunciat verbum suum Iacob: iustitias, et iudicia sua Israel.
20 २० त्याने हे दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी केले नाही; आणि त्यांनी त्याचे निर्णय जाणले नाहीत. परमेश्वराची स्तुती करा.
Non fecit taliter omni nationi: et iudicia sua non manifestavit eis. Alleluia.