< स्तोत्रसंहिता 146 >
1 १ परमेश्वराची स्तुती करा. हे माझ्या जिवा, परमेश्वराची स्तुती कर.
Алілуя!
2 २ मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराची स्तुती करीन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाची स्तवने गाईन.
хвалитиму Господа, поки живу́, співатиму Богу моє́му, аж поки існую!
3 ३ अधिपतींवर किंवा ज्याच्याठायी तारण नाही, अशा त्या मनुष्यजातीवर भरवसा ठेवू नका.
Не наді́йтесь на князів, на лю́дського сина, бо в ньому спасі́ння нема:
4 ४ जेव्हा त्याचा श्वास थांबतो, तो मातीस परत जातो; त्यादिवशी त्याच्या योजनेचाही शेवट होतो.
вийде дух його — і він до своєї землі поверта́ється, — того дня його за́думи гинуть!
5 ५ ज्याच्या मदतीला याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो आशीर्वादित आहे.
Блаженний, кому́ його поміч — Бог Яковів, що надія його — на Господа, Бога його́,
6 ६ परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले, तो सदासर्वकाळ आपले सत्य पाळतो.
що небо та землю вчинив, море й усе, що є в них, що правди пильнує навіки,
7 ७ तो जाचलेल्यांचा न्यायनिवाडा करतो, आणि तो भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मुक्त करतो.
правосу́ддя вчиняє покри́вдженим, що хліба голодним дає! Госпо́дь в'язнів розв'язує,
8 ८ परमेश्वर आंधळ्यांचे डोळे उघडतो; परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नितीमान लोकांवर प्रेम करतो.
Господь очі сліпим відкриває, Господь випросто́вує зі́гнутих, Господь милує праведних!
9 ९ परमेश्वर आपल्या देशात परक्यांचे रक्षण करतो. तो पितृहीनांना व विधवा यांना आधार देतो. परंतु तो वाईटांचा विरोध करतो.
Господь обороняє прихо́дьків, сироту́ та вдови́цю підтримує, а дорогу безбожних викри́влює!
10 १० परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो, हे सीयोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो. परमेश्वराची स्तुती करा.
Хай царю́є навіки Господь, Бог твій, Сіоне, із роду у рід! Алілу́я!