< स्तोत्रसंहिता 146 >

1 परमेश्वराची स्तुती करा. हे माझ्या जिवा, परमेश्वराची स्तुती कर.
הללו-יה הללי נפשי את-יהוה
2 मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराची स्तुती करीन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाची स्तवने गाईन.
אהללה יהוה בחיי אזמרה לאלהי בעודי
3 अधिपतींवर किंवा ज्याच्याठायी तारण नाही, अशा त्या मनुष्यजातीवर भरवसा ठेवू नका.
אל-תבטחו בנדיבים-- בבן-אדם שאין לו תשועה
4 जेव्हा त्याचा श्वास थांबतो, तो मातीस परत जातो; त्यादिवशी त्याच्या योजनेचाही शेवट होतो.
תצא רוחו ישב לאדמתו ביום ההוא אבדו עשתנתיו
5 ज्याच्या मदतीला याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो आशीर्वादित आहे.
אשרי--שאל יעקב בעזרו שברו על-יהוה אלהיו
6 परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले, तो सदासर्वकाळ आपले सत्य पाळतो.
עשה שמים וארץ-- את-הים ואת-כל-אשר-בם השמר אמת לעולם
7 तो जाचलेल्यांचा न्यायनिवाडा करतो, आणि तो भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मुक्त करतो.
עשה משפט לעשוקים--נתן לחם לרעבים יהוה מתיר אסורים
8 परमेश्वर आंधळ्यांचे डोळे उघडतो; परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नितीमान लोकांवर प्रेम करतो.
יהוה פקח עורים--יהוה זקף כפופים יהוה אהב צדיקים
9 परमेश्वर आपल्या देशात परक्यांचे रक्षण करतो. तो पितृहीनांना व विधवा यांना आधार देतो. परंतु तो वाईटांचा विरोध करतो.
יהוה שמר את-גרים--יתום ואלמנה יעודד ודרך רשעים יעות
10 १० परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो, हे सीयोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो. परमेश्वराची स्तुती करा.
ימלך יהוה לעולם-- אלהיך ציון לדר ודר הללו-יה

< स्तोत्रसंहिता 146 >