< स्तोत्रसंहिता 143 >

1 दाविदाचे स्तोत्र हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या विनवणीकडे कान दे. तू आपल्या विश्वासाने आणि न्यायीपणाने मला उत्तर दे.
Dawid dwom. Ao Awurade, tie me mpaeɛbɔ, tie me nkotosrɛ; wɔ wo nokorɛdie ne tenenee mu bra bɛboa me.
2 तू आपल्या सेवकाबरोबर न्यायनिवाड्यात प्रवेश करू नकोस. कारण तुझ्या दृष्टीने कोणीही नितीमान नाही.
Mfa wʼakoa nkɔ atemmuo mu, na ɔteasefoɔ biara ntene wɔ wʼanim.
3 शत्रू माझ्या जिवाचा पाठलाग करीत आहेत; त्यांनी माझे जीवन धुळीस मिळवले आहे; पुरातन काळच्या मेलेल्यासारखे त्याने मला अंधकाराच्या स्थळी राहण्यास लाविले आहे.
Ɔtamfoɔ no taa me, ɔbɔ me hwe fam; ɔma me tena esum mu te sɛ wɔn a wɔawuwu dadaada.
4 माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला आहे; माझे हृदय घाबरे झाले आहे.
Ɛno enti me honhom atɔ piti wɔ me mu; na mʼakoma aba mu abu wɔ me mu.
5 मी पूर्वीचे दिवस आठवतो; मी तुझ्या सर्व कृत्यांवर मनन करतो; तुझ्या हाताने सिद्धीस नेलेल्या कामावर विचार करतो.
Mekae tete nna no; medwendwene wo nnwuma ne deɛ wo nsa ayɛ nyinaa ho.
6 मी प्रार्थनेत आपले हात तुझ्यापुढे पसरतो; शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तहानेला झाला आहे.
Mepagya me nsa kyerɛ wo; wo ho sukɔm de me kra sɛ asase wesee.
7 हे परमेश्वरा, त्वरा करून मला उत्तर दे कारण माझा आत्मा क्षीण झाला आहे. माझ्यापासून तू आपले मुख लपवू नकोस, किंवा लपवशील तर मी गर्तेत उतरणाऱ्यांसारखा होईन.
Ao Awurade, gye me so ntɛm; me honhom tɔ piti. Mfa wʼanim nhinta me anyɛ saa a, mɛyɛ sɛ wɔn a wɔkɔ amena mu no.
8 सकाळी मला तुझ्या वात्सल्याचे शब्द ऐकू दे, कारण मी तुझ्यावर भरवसा ठेवला आहे. ज्या मार्गाने मी चालावे तो मला दाखव, कारण मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.
Ma mente wʼadɔeɛ a ɛnsa da no ho asɛm daa anɔpa, na mede me ho ato wo so. Kyerɛ me ɛkwan a memfa so, na wo na mema me kra so kyerɛ.
9 हे परमेश्वरा, माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर. मी लपण्यासाठी तुझ्याकडे धाव घेतो.
Ao Awurade gye me firi mʼatamfoɔ nsam, na wo mu na mede me ho hinta.
10 १० मला तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास शिकव, कारण तू माझा देव आहेस. तुझा चांगला आत्मा मला सरळपणाच्या देशात नेवो.
Kyerɛ me na menyɛ wʼapɛdeɛ, na wo ne me Onyankopɔn; ma wo honhom pa no nni me ɛkan wɔ asase tamaa so.
11 ११ हे परमेश्वरा, तुझ्या नावाकरता मला सजीव कर. तुझ्या न्यायीपणाने माझा जीव संकटातून वर काढ.
Ao Awurade, wo din enti, kyɛe me nkwa so; wo tenenee mu, yi me firi ɔhaw mu.
12 १२ तू आपल्या दयेने माझ्या शत्रूंचा नायनाट कर; आणि माझ्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश कर, कारण मी तुझा दास आहे.
Wɔ wʼadɔeɛ a ɛnsa da no mu, yi mʼatamfoɔ hɔ; na sɛe wɔn a wɔkyiri me nyinaa, na meyɛ wo ɔsomfoɔ.

< स्तोत्रसंहिता 143 >