< स्तोत्रसंहिता 143 >
1 १ दाविदाचे स्तोत्र हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या विनवणीकडे कान दे. तू आपल्या विश्वासाने आणि न्यायीपणाने मला उत्तर दे.
Psalam. Davidov. Jahve, slušaj moju molitvu, u vjernosti svojoj prikloni uho mojim vapajima, u pravednosti me svojoj usliši!
2 २ तू आपल्या सेवकाबरोबर न्यायनिवाड्यात प्रवेश करू नकोस. कारण तुझ्या दृष्टीने कोणीही नितीमान नाही.
Ne idi na sud sa slugom svojim, jer nitko živ nije pravedan pred tobom!
3 ३ शत्रू माझ्या जिवाचा पाठलाग करीत आहेत; त्यांनी माझे जीवन धुळीस मिळवले आहे; पुरातन काळच्या मेलेल्यासारखे त्याने मला अंधकाराच्या स्थळी राहण्यास लाविले आहे.
Dušmanin mi dušu progoni, o zemlju pritisnu život moj; u tmine me baci da stanujem kao oni koji su davno umrli.
4 ४ माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला आहे; माझे हृदय घाबरे झाले आहे.
Duh moj već zamire u meni, srce mi trne u grudima.
5 ५ मी पूर्वीचे दिवस आठवतो; मी तुझ्या सर्व कृत्यांवर मनन करतो; तुझ्या हाताने सिद्धीस नेलेल्या कामावर विचार करतो.
Spominjem se dana minulih, mislim o svim djelima tvojim, o djelima ruku tvojih razmišljam.
6 ६ मी प्रार्थनेत आपले हात तुझ्यापुढे पसरतो; शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तहानेला झाला आहे.
Ruke svoje za tobom pružam, duša moja k'o suha zemlja za tobom žeđa.
7 ७ हे परमेश्वरा, त्वरा करून मला उत्तर दे कारण माझा आत्मा क्षीण झाला आहे. माझ्यापासून तू आपले मुख लपवू नकोस, किंवा लपवशील तर मी गर्तेत उतरणाऱ्यांसारखा होईन.
Usliši me brzo, o Jahve, dah moj već je na izmaku! Lica svojeg preda mnom ne skrivaj, da ne postanem kao oni koji u grob silaze!
8 ८ सकाळी मला तुझ्या वात्सल्याचे शब्द ऐकू दे, कारण मी तुझ्यावर भरवसा ठेवला आहे. ज्या मार्गाने मी चालावे तो मला दाखव, कारण मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.
Objavi mi jutrom dobrotu svoju jer se uzdam u tebe. Put mi kaži kojim ću krenuti jer k tebi dušu uzdižem.
9 ९ हे परमेश्वरा, माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर. मी लपण्यासाठी तुझ्याकडे धाव घेतो.
Izbavi me, Jahve, od mojih dušmana, tebi ja se utječem.
10 १० मला तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास शिकव, कारण तू माझा देव आहेस. तुझा चांगला आत्मा मला सरळपणाच्या देशात नेवो.
Nauči me da vršim volju tvoju jer ti si Bog moj. Duh tvoj dobri nek' me po ravnu putu vodi!
11 ११ हे परमेश्वरा, तुझ्या नावाकरता मला सजीव कर. तुझ्या न्यायीपणाने माझा जीव संकटातून वर काढ.
Zbog imena svog, Jahve, poživi me, zbog svoje pravednosti dušu mi izvedi iz tjeskobe!
12 १२ तू आपल्या दयेने माझ्या शत्रूंचा नायनाट कर; आणि माझ्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश कर, कारण मी तुझा दास आहे.
Po svojoj dobroti satri moje dušmane, uništi sve moje tlačitelje, jer ja sam sluga tvoj!