< स्तोत्रसंहिता 142 >

1 दाविदाचे स्तोत्र मी आपल्या वाणीने परमेश्वरास आरोळी मारतो; मी आपल्या वाणीने परमेश्वराची प्रार्थना करतो.
قصیدۀ داوود دربارۀ زمانی که در غار بود. دعا. با صدای بلند نزد خداوند فریاد می‌زنم و درخواست کمک می‌نمایم.
2 मी आपला विलाप त्याच्यासमोर ओततो; त्यास मी आपल्या समस्या सांगतो.
تمام شکایات خود را به حضور او می‌آورم و مشکلات خود را برای او بازگو می‌کنم.
3 जेव्हा माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला, तेव्हा तू माझा मार्ग जाणला. ज्या मार्गात मी चाललो, त्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे.
وقتی جانم به لب می‌رسد او به کمکم می‌شتابد و راهی پیش پایم می‌نهد. دشمنانم بر سر راه من دام می‌گذارند.
4 माझ्या उजवीकडे न्याहाळून पाहा, कारण तेथे माझ्याविषयी कोणी पर्वा करत नाही. मला कशाचाही आश्रय नाही; माझ्या जिवाची काळजी घेणारा कोणीच नाही.
به اطراف خود نگاه می‌کنم و می‌بینم کسی نیست که مرا کمک کند. پناهی ندارم و کسی به فکر من نیست.
5 हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; मी म्हणतो, तू माझा आश्रय आहेस, जिवंताच्या भूमित तू माझा वाटा आहेस.
ای خداوند، نزد تو فریاد برمی‌آورم، و می‌گویم، «تویی پناهگاه من. در زندگی، تنها تو را آرزو دارم.
6 माझ्या आरोळीकडे लक्ष दे, कारण माझी फार दुर्दशा झाली आहे; माझा छळ करणाऱ्यांपासून मला सोडीव, कारण ते माझ्यापेक्षा बलवान आहेत.
فریادم را بشنو، زیرا بسیار درمانده هستم. مرا از دست دشمنانم برهان، زیرا آنها بسیار قویتر از من هستند.
7 मी तुझ्या नावाची उपकारस्तुती करावी, म्हणून माझा जीव बंदीतून काढ. नितीमान माझ्याभोवती जमतील, कारण तू माझ्याशी चांगला आहेस.
مرا از این پریشانی و اسارت آزاد کن، تا تو را به سبب خوبی‌هایی که برایم کرده‌ای در جمع عادلان ستایش کنم.»

< स्तोत्रसंहिता 142 >