< स्तोत्रसंहिता 142 >
1 १ दाविदाचे स्तोत्र मी आपल्या वाणीने परमेश्वरास आरोळी मारतो; मी आपल्या वाणीने परमेश्वराची प्रार्थना करतो.
大卫在洞里作的训诲诗,乃是祈祷。 我发声哀告耶和华, 发声恳求耶和华。
2 २ मी आपला विलाप त्याच्यासमोर ओततो; त्यास मी आपल्या समस्या सांगतो.
我在他面前吐露我的苦情, 陈说我的患难。
3 ३ जेव्हा माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला, तेव्हा तू माझा मार्ग जाणला. ज्या मार्गात मी चाललो, त्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे.
我的灵在我里面发昏的时候, 你知道我的道路。 在我行的路上, 敌人为我暗设网罗。
4 ४ माझ्या उजवीकडे न्याहाळून पाहा, कारण तेथे माझ्याविषयी कोणी पर्वा करत नाही. मला कशाचाही आश्रय नाही; माझ्या जिवाची काळजी घेणारा कोणीच नाही.
求你向我右边观看, 因为没有人认识我; 我无处避难, 也没有人眷顾我。
5 ५ हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; मी म्हणतो, तू माझा आश्रय आहेस, जिवंताच्या भूमित तू माझा वाटा आहेस.
耶和华啊,我曾向你哀求。 我说:你是我的避难所; 在活人之地,你是我的福分。
6 ६ माझ्या आरोळीकडे लक्ष दे, कारण माझी फार दुर्दशा झाली आहे; माझा छळ करणाऱ्यांपासून मला सोडीव, कारण ते माझ्यापेक्षा बलवान आहेत.
求你侧耳听我的呼求, 因我落到极卑之地; 求你救我脱离逼迫我的人, 因为他们比我强盛。
7 ७ मी तुझ्या नावाची उपकारस्तुती करावी, म्हणून माझा जीव बंदीतून काढ. नितीमान माझ्याभोवती जमतील, कारण तू माझ्याशी चांगला आहेस.
求你领我出离被囚之地, 我好称赞你的名。 义人必环绕我, 因为你是用厚恩待我。