< स्तोत्रसंहिता 140 >
1 १ दाविदाचे स्तोत्र हे परमेश्वरा, मला दुष्टांपासून सोडव; जुलमी मनुष्यापासून मला सुरक्षित ठेव.
Избави ме, Господе, од човека злог, сачувај ме од насилника,
2 २ ते आपल्या मनात वाईट योजना करतात; ते प्रत्येक दिवशी भांडणाला सुरुवात करतात.
Који помишљају зло у срцу и сваки дан подижу рат;
3 ३ त्यांची जीभ सर्पासारखी जखम करते; त्यांच्या ओठाखाली विषारी सर्पाचे विष आहे.
Оштре језик свој као змија, јед је аспидин у устима њиховим.
4 ४ हे परमेश्वरा, मला दुष्टांच्या हातातून वाचव; मला जुलमी मनुष्यांपासून सुरक्षित ठेव. त्यांनी मला ढकलण्याची योजना केली आहे.
Сачувај ме, Боже, од руку безбожничких, од насилника сахрани ме, који мисле да поткину ноге моје.
5 ५ गर्विष्ठांनी माझ्यासाठी पाश व दोऱ्या लपवून ठेविल्या आहेत; त्यांनी रस्त्याच्या बाजूला जाळे पसरले आहे; त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला आहे.
Охоли ми наместише замке и пругла, метнуше ми мрежу на пут, пређу разапеше ми.
6 ६ मी परमेश्वरास म्हणतो, तू माझा देव आहेस; हे परमेश्वरा, माझ्या विनवण्यांच्या वाणीकडे कान दे.
Рекох Господу: Ти си Бог мој, услиши, Господе, глас мољења мог.
7 ७ हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या, माझ्या लढाईच्या दिवसात तू माझे शिरस्राण आहेस.
Господе, Господе, крепки Спаситељу мој, заклони главу моју у дан ратни!
8 ८ हे परमेश्वरा, दुष्टांच्या इच्छा पुरवू नको, त्यांच्या दुष्ट योजना यशस्वी होऊ देऊ नकोस. नाही तर ते उन्मत्त होतील.
Не дај, Господе, безбожнику шта жели, не дај му да докучи шта је наумио, да се не узносе.
9 ९ ज्यांनी मला घेरले आहे; त्यांच्या ओठापासून होणारा अनर्थ त्यांच्याच शिरी पडो.
Отров оних што су око мене, погибао уста њихових нека се обрати на њих.
10 १० त्यांच्यावर जळते निखारे पडोत; त्यांना अग्नीत टाकले जावो, ज्यातून त्यांना उठून वर कधीही येता येणार नाही अशा खड्यात फेकण्यात येवो.
Нека падне на њих живо угљевље; нека их Он баци у огањ, у пропасти, да не устану.
11 ११ वाईट बोलणारा पृथ्वीवर सुरक्षित केला जाणार नाही; जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एकसारखे लागेल.
Човек језичан неће се утврдити на земљи, неправедног ће злоћа увалити у погибао.
12 १२ परमेश्वर गरीबांच्या पक्षाचे, आणि गरजवंताच्या वादाचे समर्थन करील हे मला माहित आहे.
Знам да ће Господ показати правду невољноме и правицу убогима.
13 १३ खचित नितीमान तुझ्या नावाची उपकारस्तुती करतील; सरळ मनाचे तुझ्या समक्षतेत राहतील.
Да! Праведни ће славити име Твоје, прави ће остати пред лицем Твојим.