< स्तोत्रसंहिता 140 >

1 दाविदाचे स्तोत्र हे परमेश्वरा, मला दुष्टांपासून सोडव; जुलमी मनुष्यापासून मला सुरक्षित ठेव.
上主,求您救拔我脫離兇惡的人; 上主,求您保護我脫離強暴的人!
2 ते आपल्या मनात वाईट योजना करतात; ते प्रत्येक दिवशी भांडणाला सुरुवात करतात.
他們心中策劃惡謀,他們終日挑撥爭鬥;
3 त्यांची जीभ सर्पासारखी जखम करते; त्यांच्या ओठाखाली विषारी सर्पाचे विष आहे.
他們磨快自己的舌尖,有如蛇蝮,他們的雙脣的下面,含有蛇毒。 (休止)
4 हे परमेश्वरा, मला दुष्टांच्या हातातून वाचव; मला जुलमी मनुष्यांपासून सुरक्षित ठेव. त्यांनी मला ढकलण्याची योजना केली आहे.
上主,求您拯救我脫離兇惡的人;上主,求您保護我擺脫強暴的人,因他們企圖要我腳步滑倒。
5 गर्विष्ठांनी माझ्यासाठी पाश व दोऱ्या लपवून ठेविल्या आहेत; त्यांनी रस्त्याच्या बाजूला जाळे पसरले आहे; त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला आहे.
驕傲人給我暗暗設網羅,張起繩索作為圈套,設下陷井等我路過。 (休止)
6 मी परमेश्वरास म्हणतो, तू माझा देव आहेस; हे परमेश्वरा, माझ्या विनवण्यांच्या वाणीकडे कान दे.
我求上主說:您是我的天主;上主,求您聽我哀禱的苦訴!
7 हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या, माझ्या लढाईच्या दिवसात तू माझे शिरस्राण आहेस.
上主天主,您是我有力的救助,在作戰時,請您掩護我的頭顱。
8 हे परमेश्वरा, दुष्टांच्या इच्छा पुरवू नको, त्यांच्या दुष्ट योजना यशस्वी होऊ देऊ नकोस. नाही तर ते उन्मत्त होतील.
上主,求您不要順隨惡人的奢欲;上主,請不要完成他們的計謀。 (休止)
9 ज्यांनी मला घेरले आहे; त्यांच्या ओठापासून होणारा अनर्थ त्यांच्याच शिरी पडो.
願那些顯露頭而圍困我的人,出於他們口脣的詛咒,反歸己身。
10 १० त्यांच्यावर जळते निखारे पडोत; त्यांना अग्नीत टाकले जावो, ज्यातून त्यांना उठून वर कधीही येता येणार नाही अशा खड्‌यात फेकण्यात येवो.
願火降落在他們的身上,將他們拋入深坑免再高昂。
11 ११ वाईट बोलणारा पृथ्वीवर सुरक्षित केला जाणार नाही; जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एकसारखे लागेल.
搬弄是非的人,不得在世久存,災禍會突然使強暴的人被擒。
12 १२ परमेश्वर गरीबांच्या पक्षाचे, आणि गरजवंताच्या वादाचे समर्थन करील हे मला माहित आहे.
我確知上主必為受壓迫的人伸冤,也必為貧窮的人主持正義的判斷。
13 १३ खचित नितीमान तुझ्या नावाची उपकारस्तुती करतील; सरळ मनाचे तुझ्या समक्षतेत राहतील.
義人必定將您的聖名頌讚,善人必定居住在您的面前。

< स्तोत्रसंहिता 140 >