< स्तोत्रसंहिता 14 >
1 १ मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो, “देव नाही.” ते भ्रष्ट झाले आहेत आणि त्यांनी घृणास्पद अशी पापे केली आहेत. चांगले करणारा कोणीच नाही.
For the Chief Musician. By David. The fool has said in his heart, “There is no God.” They are corrupt. They have done abominable deeds. There is no one who does good.
2 २ परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की, कोणी एखादा तरी समजणारा आणि त्याच्यामागे चालणारा आहे काय?
The LORD looked down from heaven on the children of men, to see if there were any who understood, who sought after God.
3 ३ प्रत्येकजण बहकून गेला आहे, ते सर्व गलिच्छ झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीही नाही, एकही नाही.
They have all gone aside. They have together become corrupt. There is no one who does good, no, not one.
4 ४ जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय? ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांस खातात; ते परमेश्वरास हाक मारत नाहीत?
Have all the workers of iniquity no knowledge, who eat up my people as they eat bread, and don’t call on the LORD?
5 ५ परंतु ते भीतीने थरथर कापतील, कारण देव न्यायींच्या सभेत आहे.
There they were in great fear, for God is in the generation of the righteous.
6 ६ तुम्ही गरीब मनुष्याचा अपमान करू इच्छित आहात, तरी परमेश्वर त्याचा आश्रय आहे.
You frustrate the plan of the poor, because the LORD is his refuge.
7 ७ अहा! सियोनातून इस्राएलाचे तारण आले तर किती बरे होईल! जेव्हा परमेश्वर त्याच्या लोकांस दास्यातून सोडवेल, तेव्हा याकोब आनंदी होईल आणि इस्राएल हर्ष करेल.
Oh that the salvation of Israel would come out of Zion! When the LORD restores the fortunes of his people, then Jacob shall rejoice, and Israel shall be glad.