< स्तोत्रसंहिता 139 >
1 १ दाविदाचे स्तोत्र हे परमेश्वरा, तू माझी परीक्षा केली आहेस, आणि तू मला जाणतोस;
Y Salmon David. O Jeova, guinin unrejistrayo, ya guinin untungoyo.
2 २ मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहित आहे; तुला माझे विचार खूप दुरुनही समजतात.
Untutungoja y finatachongjo yan y quinajulojo; untutungoja y jinasoco desde y chagogo.
3 ३ तू माझे चालने आणि माझे झोपणे बारकाईने पाहतो; तू माझ्या मार्गांशी परिचित आहेस.
Unlilicue y finaposo yan y fanasonjo, ya untutungo todo y chalanjo.
4 ४ हे परमेश्वरा, माझ्या मुखातून निघणारा एकही शब्द तुला पूर्णपणे माहित नाही असे मुळीच नाही.
Sa taya ni un sinangan gui jilajo: jao, estagüe, na untungoja todo, O Jeova.
5 ५ तू मागून व पुढून मला घेरले आहेस, आणि माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस.
Unoriyayeyo gui menajo, yan y tateco: yan unpolo y canaemo gui jilojo.
6 ६ हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे; ते खूप अगम्य आहे, ते मी समजू शकत नाही.
Gosnámanman este na tiningo para guajo; gostaquilo, ti siña jucomprende.
7 ७ मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निसटून जाऊ शकतो? मी तुझ्या सान्निध्यापासून कोठे पळून जाऊ शकतो?
Manoyo guato taegüe y espiritumo? pat manoyo jufalagüe taegüe yo gui menamo?
8 ८ मी जर वर आकाशात चढलो तर तिथे तू आहेस; जर मी खाली मृत्यूलोकात अंथरूण केले तरी, पाहा, तेथे तू आहेस. (Sheol )
Yaguin cumajuloyo gui langet gaegueja jao güije; yanguin jujuto y camajo guiya sasalaguan, gaegueja jao locue güije. (Sheol )
9 ९ जर मी पहाटेचे पंख धारण करून आणि समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तू आहेस.
Yanguin juchule y papan y egaan, ya jusaga gui uttimon y tase;
10 १० तरी तिथे ही तुझा उजवा हात मला धरतो. आणि तू मला हाताने धरून नेतोस.
Asta ayo gaegueja y canaemo na jaosgagaejonyo, ya y agapa na canaemo umantieneyo.
11 ११ जरी मी म्हणालो, खचित अंधार मला लपविल, आणि तरीही रात्र माझ्याभोवती प्रकाशच होईल.
Yanguin jualog: Magajet na utampeyo y jemjom: asta y puenge uinayo.
12 १२ काळोख देखील तुझ्यापासून काहीच लपवित नाही. रात्रही दिवसासारखीच प्रकाशते, कारण तुला काळोख आणि प्रकाश दोन्ही सारखेच आहेत.
Asta y jemjom ti uninatogüe: lao y puenge ufanina taegüije y jaane: y jemjom yan y mananana manparejoja para jago.
13 १३ तू माझे अंतर्याम निर्माण केलेस; तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले.
Jago tumungo yo, sa jago magas y sumanjalomjo; guinin untampeyo gui jalom tiyan nanajo.
14 १४ मी तुला धन्यवाद देतो, कारण तुझी कृत्ये भयचकीत आणि आश्चर्यकारक आहेत, हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो.
Junae jao grasias: sa gosnamaañao yan gosnamanman y mafatinasso: mannamanman y chechomo; ya y antijo jagostungo este.
15 १५ मी गुप्तस्थळी निर्माण होत असता, आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती.
Y tataotaojo ti umatog guiya jago, anae mafatinasyo gui secreto; ya matufog yo ni namanman, gui mas tagpapa na lugat gui tano.
16 १६ तू मला गर्भात पिंडरूपाने असताना पाहिलेस; माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या पुस्तकात नमूद करून ठेवले होते.
Y atadogmo lumie y tataotaojo ya ti cabales: ya y lebblomo nae manmatugue todo y pedason tataotaojo, ya taya ufatta.
17 १७ हे देवा, तुझे विचार मला किती मोलवान आहेत, त्यांची संख्या किती मोठी आहे.
Jafa muna guaguan y jinasomo guiya guajo, O Yuus! Jafa muna megae sumaña!
18 १८ मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त ठरतील. जेव्हा मी जागा होतो, तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो.
Yanguin jutufong sija, manmegaeña y numeroña qui y inae: yanguin magmatayo, gaeguejayo trabia guiya jago.
19 १९ हे देवा! जर तू दुष्टांना मारुन टाकशील; अहो हिंसाचारी मनुष्यांनो! माझ्यापासून दूर व्हा.
Seguro na unpuno y taelaye, O Yuus: enaomina mañuja guiya guajo y manmejga na taotao sija.
20 २० ते तुझ्याविरूद्ध बंड आणि कपटाने कृती करतात; तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात.
Sa manguentos taelaye contra jago, ya y enimigumo sija machule y naanmo pot taya.
21 २१ परमेश्वरा! तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्याविरुध्द उठणाऱ्यांचा मी का तिरस्कार करू नये?
Ada ti juchatlie ayo sija, O Jeova, y chumatlie jao? yan ada ti unatristeyo pot ayo sija y mangajulo contra jago?
22 २२ मी त्यांच्या पराकाष्ठेचा पूर्ण द्वेष करतो; ते माझे शत्रू झाले आहेत.
Juchatlie sija ni y cabales na chinatlie: jutufong sija pot y enemigujo.
23 २३ हे देवा, माझे परीक्षण कर आणि माझे मन जाण; माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे.
Rejistrayo O Yuus, ya untungo y corasonjo: chagueyo ya untungo y jinasoco sija.
24 २४ माझ्या मनात जर काही दुष्ट मार्ग असतील तर पाहा, आणि मला सनातन मार्गाने चालीव.
Ya unlie cao guaja taelaye gui sumanjalomjo, ya unchachalaneyo gui chalan taejinecog.