< स्तोत्रसंहिता 138 >
1 १ दाविदाचे स्तोत्र मी अगदी मनापासून तुझी उपकारस्तुती करीन; मी देवांसमोर तुझी स्तोत्रे गाईन.
Av David. Eg vil prisa deg av alt mitt hjarta, for augo på gudarne vil eg syngja deg lov.
2 २ मी तुझ्या पवित्र मंदिराकडे नतमस्तक होऊन, तुझ्या कराराची विश्वासयोग्यता आणि तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकारस्तुती करीन. तू आपल्या संपूर्ण नावापेक्षा आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहेस.
Eg vil kasta meg ned framfyre ditt heilage tempel, eg vil takka ditt namn for di miskunn og for din truskap; for du hev gjort ditt ord herlegt yver alt ditt namn.
3 ३ मी तुला हाक मारली त्याच दिवशी तू मला उत्तर दिलेस. तू मला उत्तेजन दिले आणि तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले.
Den dagen eg ropa, svara du meg, du gjorde meg frihuga, styrkte mi sjæl.
4 ४ हे परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी उपकारस्तुती करतील, कारण त्यांनी तुझ्या मुखातील शब्द ऐकले आहेत.
Herre, alle kongar på jordi skal prisa deg, når dei fær høyra ordi av din munn.
5 ५ खरोखर, ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील कारण परमेश्वराचा महिमा अगाध आहे.
Og dei skal syngja um Herrens vegar; for Herrens æra er stor,
6 ६ कारण परमेश्वर थोर आहे तरी तो दीनांकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो.
for Herren er høg og ser til den låge, og den stormodige kjenner han langan veg.
7 ७ जरी मी संकटांमध्ये चाललो तरी तू मला सुरक्षित ठेवतोस. माझ्या शत्रूंच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस; आणि तुझा उजवा हात माझे तारण करतो.
Um eg ferdast midt i naudi, held du meg i live, mot harmen til mine fiendar retter du ut di hand, og ho frelser meg, di høgre hand.
8 ८ परमेश्वर माझ्याबरोबर शेवटपर्यंत आहे; हे परमेश्वरा, तुझी कराराची विश्वासयोग्यता सदासर्वकाळ आहे. तू आपल्या हातची कामे सोडून देऊ नकोस.
Herren vil fullføra sitt verk for meg. Herre, di miskunn varer æveleg; det verk dine hender hev gjort, må du ikkje gjeva upp!