< स्तोत्रसंहिता 137 >
1 १ आम्ही बाबेलाच्या नद्यांजवळ खाली बसलो; आणि जेव्हा आम्ही सियोनेविषयी विचार केला तेव्हा रडलो.
Babil ırmakları kıyısında oturup Siyon'u andıkça ağladık;
2 २ तेथील वाळुंजावर आम्ही आमच्या वीणा टांगल्या.
Çevredeki kavaklara Lirlerimizi astık.
3 ३ तेथे आम्हास पकडणाऱ्यांनी आम्हास गाणी गावयाला सांगितले आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी करमणूक करावी म्हणून आम्हांस म्हणाले, सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा.
Çünkü orada bizi tutsak edenler bizden ezgiler, Bize zulmedenler bizden şenlik istiyor, “Siyon ezgilerinden birini okuyun bize!” diyorlardı.
4 ४ परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे कसे गावे?
Nasıl okuyabiliriz RAB'bin ezgisini El toprağında?
5 ५ हे यरूशलेमे, मी जर तुला विसरलो, तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो.
Ey Yeruşalim, seni unutursam, Sağ elim kurusun.
6 ६ जर मी तुला विसरलो, जर मी यरूशलेमेला आपल्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानले नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.
Seni anmaz, Yeruşalim'i en büyük sevincimden üstün tutmazsam, Dilim damağıma yapışsın!
7 ७ हे परमेश्वरा, अदोमाविरूद्ध यरूशलेमेच्या त्या दिवसाची आठवण कर, ते म्हणाले, ती पाडून टाका, पायापर्यंत पाडून टाका.
Yeruşalim'in düştüğü gün, “Yıkın onu, yıkın temellerine kadar!” Diyen Edomlular'ın tavrını anımsa, ya RAB.
8 ८ हे बाबेलाच्या कन्ये, तू लवकरच ओसाड पडणार आहेस, कारण जसे तू आम्हास केले तसे, जो तुला परत करील तो आशीर्वादित आहे.
Ey sen, yıkılası Babil kızı, Bize yaptıklarını Sana ödetecek olana ne mutlu!
9 ९ जो तुझी बालके घेऊन त्यांना खडकावर आपटून ठार मारतो तो आशीर्वादित होईल.
Ne mutlu senin yavrularını tutup Kayalarda parçalayacak insana!