< स्तोत्रसंहिता 137 >

1 आम्ही बाबेलाच्या नद्यांजवळ खाली बसलो; आणि जेव्हा आम्ही सियोनेविषयी विचार केला तेव्हा रडलो.
By the rivers of Babylon we sat and wept when we remembered Zion.
2 तेथील वाळुंजावर आम्ही आमच्या वीणा टांगल्या.
There on the willows we hung our harps,
3 तेथे आम्हास पकडणाऱ्यांनी आम्हास गाणी गावयाला सांगितले आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी करमणूक करावी म्हणून आम्हांस म्हणाले, सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा.
for there our captors requested a song; our tormentors demanded songs of joy: “Sing us a song of Zion.”
4 परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे कसे गावे?
How can we sing a song of the LORD in a foreign land?
5 हे यरूशलेमे, मी जर तुला विसरलो, तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो.
If I forget you, O Jerusalem, may my right hand cease to function.
6 जर मी तुला विसरलो, जर मी यरूशलेमेला आपल्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानले नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.
May my tongue cling to the roof of my mouth if I do not remember you, if I do not exalt Jerusalem as my greatest joy!
7 हे परमेश्वरा, अदोमाविरूद्ध यरूशलेमेच्या त्या दिवसाची आठवण कर, ते म्हणाले, ती पाडून टाका, पायापर्यंत पाडून टाका.
Remember, O LORD, the sons of Edom on the day Jerusalem fell: “Destroy it,” they said, “tear it down to its foundations!”
8 हे बाबेलाच्या कन्ये, तू लवकरच ओसाड पडणार आहेस, कारण जसे तू आम्हास केले तसे, जो तुला परत करील तो आशीर्वादित आहे.
O Daughter of Babylon, doomed to destruction, blessed is he who repays you as you have done to us.
9 जो तुझी बालके घेऊन त्यांना खडकावर आपटून ठार मारतो तो आशीर्वादित होईल.
Blessed is he who seizes your infants and dashes them against the rocks.

< स्तोत्रसंहिता 137 >