< स्तोत्रसंहिता 136 >
1 १ परमेश्वराची उपकारस्तुती करा; कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Mida akpe na Yehowa, elabena enyo.
2 २ देवांच्या देवाची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Mida akpe na mawuwo dzi Mawu la,
3 ३ प्रभूंच्या प्रभूंची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Mida akpe na aƒetɔwo dzi Aƒetɔ la,
4 ४ जो एकटाच महान चमत्कार करतो त्याची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Eya ɖeka hɔ̃ɔ koe wɔa nukunu dzɔatsuwo,
5 ५ ज्याने बुद्धीने आकाश निर्माण केले त्याची, उपकारस्तुती करा, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Eya ame si tsɔ eƒe nugɔmesese wɔ dziƒowoe,
6 ६ ज्याने जलावर पृथ्वी पसरवली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Ame si keke anyigba ɖe tsiwo dzi,
7 ७ ज्याने मोठा प्रकाश निर्माण केला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Ame si wɔ nu keklẽ gãwo,
8 ८ दिवसावर राज्य करण्यासाठी त्याने सूर्याची निर्मिती केली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Be ɣe naɖu ŋkeke dzi,
9 ९ त्याने रात्रीवर राज्य करण्यासाठी चंद्र आणि ताऱ्यांची निर्मिती केली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Be ɣleti kple ɣletiviwo naɖu zã dzi,
10 १० त्याने मिसराचे पहिले जन्मलेले मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Eya ame si ƒo Egiptetɔwo ƒe ŋgɔgbeviwo ƒu anyi,
11 ११ आणि ज्याने इस्राएलाला त्यांच्यामधून बाहेर काढले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Eye wòkplɔ Israel do goe le wo dome,
12 १२ ज्याने सामर्थ्यी हाताने आणि बाहू उभारून त्यांना बाहेर आणले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Kple asi sesẽ kple abɔ si wòdo ɖe dzi,
13 १३ ज्याने लाल समुद्र दुभागला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Eya ame si ma Ƒu Dzĩ la ɖe eve,
14 १४ ज्याने इस्राएलाला त्यामधून पार नेले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Eye wòkplɔ Israel to eƒe titina,
15 १५ ज्याने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात उलथून टाकले. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Ke ekplɔ Farao kple eƒe aʋakɔ la de Ƒu Dzĩ la me,
16 १६ ज्याने आपल्या लोकांस रानातून नेले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Eya ame si kplɔ eƒe dukɔ la to gbedzi,
17 १७ ज्याने महान राजांना मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Ame si ƒo fia gãwo ƒu anyi,
18 १८ आणि ज्याने प्रसिद्ध राजांना मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Eye wòwu fia sesẽwo,
19 १९ ज्याने अमोऱ्यांच्या सीहोन राजाला मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Sixɔn, Amoritɔwo ƒe fia,
20 २० आणि ज्याने बाशानाच्या ओग राजाला मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
kple Ɔg, Basantɔwo ƒe fia,
21 २१ आणि ज्याने त्यांचा देश वतन असा दिला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Eye wòtsɔ woƒe anyigba wɔ domenyinu,
22 २२ ज्याने तो इस्राएल त्याचा सेवक याला वतन म्हणून दिला. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Domenyinu na eƒe dɔla, Israel,
23 २३ ज्याने आमच्या कठीन परिस्थितीत आमची आठवण केली आणि आम्हास मदत केली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Eya ame si ɖo ŋku mía dzi, esime wobɔbɔ mí ɖe anyi,
24 २४ ज्याने आम्हास आमच्या शत्रूंवर विजय दिला त्याची, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Eye wòɖe mí tso míaƒe futɔwo ƒe asi me,
25 २५ जो सर्व जिवंत प्राण्यांना अन्न देतो. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Eya ame si naa nuɖuɖu nu gbagbe ɖe sia ɖe,
26 २६ स्वर्गातील देवाची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Mida akpe na Dziƒo Mawu la,