< स्तोत्रसंहिता 136 >

1 परमेश्वराची उपकारस्तुती करा; कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Halleluja! Tak HERREN, thi han er god; thi hans Miskundhed varer evindelig!
2 देवांच्या देवाची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Tak Gudernes Gud; thi hans miskundhed varer evindelig!
3 प्रभूंच्या प्रभूंची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Tak Herrens Herre; thi hans miskundhed varer evindelig!
4 जो एकटाच महान चमत्कार करतो त्याची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Han, der ene gør store undere; thi hans miskundhed varer evindelig!
5 ज्याने बुद्धीने आकाश निर्माण केले त्याची, उपकारस्तुती करा, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Som skabte Himlen med indsigt; thi hans miskundhed varer evindelig!
6 ज्याने जलावर पृथ्वी पसरवली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Som bredte jorden på vandet; thi hans miskundhed varer evindelig!
7 ज्याने मोठा प्रकाश निर्माण केला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Som skabte de store lys; thi hans miskundhed varer evindelig!
8 दिवसावर राज्य करण्यासाठी त्याने सूर्याची निर्मिती केली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Sol til at råde om dagen; thi hans miskundhed varer evindelig!
9 त्याने रात्रीवर राज्य करण्यासाठी चंद्र आणि ताऱ्यांची निर्मिती केली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Måne og stjerner til at råde om natten; thi hans miskundhed varer evindelig!
10 १० त्याने मिसराचे पहिले जन्मलेले मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Som slog Ægyptens førstefødte; thi hans Miskundhed varer evindelig!
11 ११ आणि ज्याने इस्राएलाला त्यांच्यामधून बाहेर काढले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Og førte Israel ud derfra; thi hans Miskundhed varer evindelig!
12 १२ ज्याने सामर्थ्यी हाताने आणि बाहू उभारून त्यांना बाहेर आणले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Med stærk 'Hånd og udstrakt Arm; thi hans Miskundhed varer evindelig!
13 १३ ज्याने लाल समुद्र दुभागला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Som kløved det røde Hav; thi hans Miskundhed varer evindelig!
14 १४ ज्याने इस्राएलाला त्यामधून पार नेले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Og førte tsrael midt igennem det; thi hans Miskundhed varer evindelig!
15 १५ ज्याने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात उलथून टाकले. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Som drev Farao og hans Hær i det røde Hav thi hans Miskundhed varer evindelig!
16 १६ ज्याने आपल्या लोकांस रानातून नेले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Som førte sit Folk i Ørkenen; thi hans Miskundhed varer evindelig!
17 १७ ज्याने महान राजांना मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Som fældede store Konger; thi hans Miskundhed varer evindelig!
18 १८ आणि ज्याने प्रसिद्ध राजांना मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Og veg så vældige Konger; thi hans Miskundhed varer evindelig!
19 १९ ज्याने अमोऱ्यांच्या सीहोन राजाला मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Amoriternes Konge Sion, thi hans Miskundhed varer evindelig!
20 २० आणि ज्याने बाशानाच्या ओग राजाला मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Og Basans Konge Og thi hans Miskundhed varer evindelig!
21 २१ आणि ज्याने त्यांचा देश वतन असा दिला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Og gav deres Land i Eje; thi hans Miskundhed varer evindelig!
22 २२ ज्याने तो इस्राएल त्याचा सेवक याला वतन म्हणून दिला. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
I Eje til hans Tjener Israel; thi hans Miskundhed varer evindelig!
23 २३ ज्याने आमच्या कठीन परिस्थितीत आमची आठवण केली आणि आम्हास मदत केली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Som kom os i Hu i vor Ringhed; thi hans Miskundhed varer evindelig!
24 २४ ज्याने आम्हास आमच्या शत्रूंवर विजय दिला त्याची, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Og friede os fra vore Fjender; thi hans Miskundhed varer evindelig!
25 २५ जो सर्व जिवंत प्राण्यांना अन्न देतो. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Som giver alt Kød Føde; thi hans Miskundhed varer evindelig!
26 २६ स्वर्गातील देवाची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Tak Himlenes Gud; thi hans Miskundhed varer evindelig!

< स्तोत्रसंहिता 136 >