< स्तोत्रसंहिता 135 >
1 १ परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो, तुम्ही त्याची स्तुती करा.
Hallelujah! Lobet den Namen Jehovahs, lobet, ihr Knechte Jehovahs!
2 २ परमेश्वराच्या घरात उभे राहाणाऱ्यांनो, आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहाणाऱ्यांनो, तुम्ही त्याची स्तुती करा.
Ihr, die ihr steht in dem Hause Jehovahs, in den Höfen des Hauses unseres Gottes:
3 ३ परमेश्वराची स्तुती करा, कारण तो चांगला आहे; त्याच्या नावाचे गुणगान करा कारण ते करणे आनंददायक आहे.
Hallelujah; denn gut ist Jehovah. Singt Psalmen Seinem Namen; denn lieblich ist Er.
4 ४ कारण परमेश्वराने याकोबाला आपल्यासाठी निवडले आहे, इस्राएल त्याच्या मालमत्तेप्रमाणे आहे.
Denn Jakob hat Jah Sich erwählt, Israel zu Seinem besonderen Eigentum.
5 ५ परमेश्वर महान आहे हे मला माहीत आहे, आमचा प्रभू सर्व देवांच्या वर आहे.
Denn ich weiß, daß groß ist Jehovah, und unser Herr vor allen Göttern;
6 ६ परमेश्वराची जी इच्छा आहे तसे तो आकाशात, पृथ्वीवर, समुद्रात आणि खोल महासागरात करतो.
Alles, wozu Jehovah Lust hat, tut Er im Himmel und auf Erden, im Meer und allen Abgründen.
7 ७ तो पृथ्वीच्या शेवटापासून ढग वर चढवतो. तो पावसासाठी विजा निर्माण करतो; आणि आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो.
Er führt Dünste herauf vom Ende der Erde, macht Blitze zu Regen, bringt den Wind heraus aus Seinen Schätzen.
8 ८ त्याने मिसर देशातील मनुष्यांचे आणि प्राण्यांचे दोघांचे पहिले जन्मलेले मारून टाकले.
Der die Erstgeborenen Ägyptens schlug vom Menschen bis zum Vieh;
9 ९ हे मिसरा, त्याने तुझ्यामध्ये, फारो व त्याचे सर्व सेवक यांच्याविरूद्ध चिन्ह व चमत्कार पाठवले.
Er sandte Zeichen und Wahrzeichen, in deine Mitte Ägypten, wider Pharao und wider alle seine Knechte.
10 १० त्याने पुष्कळ राष्ट्रांवर हल्ला केला, आणि शक्तीमान राजांना मारून टाकले,
Der viele Völkerschaften hat geschlagen und mächtige Könige erwürgte.
11 ११ अमोऱ्यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग आणि कनानमधल्या सर्व राज्यांचा पराभव केला.
Sichon, den König der Amoriter, und Og, den König Baschans, und alle Königreiche Kanaans.
12 १२ त्यांचा देश त्याने वतन असा दिला, आपल्या इस्राएल लोकांसाठी वतन करून दिला.
Und Der ihr Land zum Erbe hat gegeben, zum Erbe Israel, Seinem Volke.
13 १३ हे परमेश्वरा, तुझे नाव सर्वकाळ टिकून राहिल, हे परमेश्वरा, तुझी किर्ती सर्व पिढ्यानपिढ्या राहील.
Jehovah, Dein Name ist ewig, Jehovah, Dein Gedächtnis zu Geschlecht und Geschlecht.
14 १४ कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील, आणि त्यास आपल्या सेवकांचा कळवळा येईल.
Denn Recht wird sprechen Seinem Volk Jehovah, und es wird Ihn gereuen wegen Seiner Knechte.
15 १५ राष्ट्रांच्या मूर्ती सोन्या व रुप्याच्या आहेत, त्या मनुष्याच्या हाताचे काम आहेत.
Die Götzen der Völkerschaften sind Silber und Gold, sie sind gemacht von den Händen des Menschen.
16 १६ त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण त्या बोलत नाहीत; त्यांना डोळे आहेत पण त्या पाहत नाहीत.
Einen Mund haben sie und reden nicht; Augen haben sie und sehen nicht.
17 १७ त्यांना कान आहेत, पण त्या ऐकत नाहीत, त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही.
Sie haben Ohren und nehmen nicht zu Ohren, auch ist in ihrem Mund kein Hauch.
18 १८ जे त्या बनवितात, जे प्रत्येकजण त्याच्यावर भरवसा ठेवणारे त्यांच्यासारख्याच त्या आहेत.
Wie sie werden sein, die sie machen, ein jeder, der auf sie vertraut.
19 १९ हे इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा; अहरोनाच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा.
O Haus Israel, segnet Jehovah; o Haus Aharons, segnet Jehovah!
20 २० लेवीच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा. परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो परमेश्वराचा धन्यवाद करा.
O Haus Levi, segnet Jehovah; die ihr Jehovah fürchtet, segnet Jehovah!
21 २१ जो परमेश्वर यरूशलेमेत राहतो, त्याचा धन्यवाद सियोनेत होवो. परमेश्वराची स्तुती करा.
Gesegnet sei Jehovah aus Zion, Er, Der in Jerusalem wohnt. Hallelujah!