< स्तोत्रसंहिता 133 >
1 १ दाविदाचे स्तोत्र पाहा, बंधूंनी ऐक्यात एकत्र राहणे किती चांगले आणि आनंददायक आहे.
Ein Stufenlied von David. / Sieh, wie schön und wie lieblich ist's, / Wenn Brüder auch (friedlich) beisammen wohnen.
2 २ ते डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे, अहरोनाच्या दाढीखालून ओघळणाऱ्या तेलासारखे, त्याच्या वस्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या बहुमूल्य तेलासारखे आहे.
Das gleicht dem köstlichen Öl auf dem Haupt, / Das herabfloß auf den Bart, / Auf Aarons Bart, der niederwallte / Auf seiner Gewänder Rand.
3 ३ सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.
Es gleicht auch dem Hermontau, / Der auf Zions Berg niederfällt. / Denn dorthin hat Jahwe den Segen entboten, / Leben für immer.