< स्तोत्रसंहिता 132 >

1 हे परमेश्वरा, दावीदाकरता त्याच्या सर्व दुःखांची आठवण कर.
上主,求您以慈愛懷念達味,和他所有的一切焦思勞瘁:
2 त्याने परमेश्वराकडे कशी शपथ वाहिली, त्याने याकोबाच्या समर्थ प्रभूला कसा नवस केला, याची आठवण कर.
因為他曾向上主立過了誓言,向雅各伯的全能者許過願:
3 तो म्हणाला “मी आपल्या घरात किंवा मी आपल्या अंथरुणात जाणार नाही.
我決不進入我住家中的帳幔,也決不登上我躺臥的床沿,
4 मी आपल्या डोळ्यांवर झोप किंवा आपल्या पापण्यास विसावा देणार नाही.
不容許我的眼睛睡眠,也不讓我的眼臉安閑,
5 परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या सर्वसमर्थ देवासाठी निवासमंडप सापडेपर्यंत मी असेच करीन.”
直到我給上主尋找到一個處所,給雅各伯的全能者將居地覓妥。
6 पाहा, आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले; आम्हास तो जारच्या रानात सापडला.
看,我們聽說約櫃在厄弗辣大,我們在雅阿爾的平原找到了它。
7 आम्ही देवाच्या निवासमंडपात जाऊ; आम्ही त्याच्या पदासनापाशी आराधना करू आणि म्हणू.
大家一同進祂的居所,並在祂的腳凳下崇拜說:
8 हे परमेश्वरा, ऊठ; तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रांतीस्थानी ये,
上主,請您和您威嚴的約櫃,起來駕臨到您安息的住宅,
9 तुझे याजक नितीमत्तेचे वस्रे पांघरोत; तुझे विश्वासू आनंदाने जयघोष करोत.
願您的司祭身披正義,願您的信徒踴躍歡喜。
10 १० तुझा सेवक दावीदाकरिता, तू आपल्या अभिषिक्त राजापासून निघून जाऊ नकोस.
為了您僕人達味的情面,不要將您的受傅者輕看!
11 ११ परमेश्वराने विश्वसनीय दावीदाजवळ शपथ वाहिली आहे; तो त्याच्या शपथेपासून माघार घेणार नाही, मी तुझ्या वंशातून तुझ्या राजासनावर एकाला बसवीन.
上主既然向達味起了誓,真理的約言決不再收回:我要使您的親生兒子,榮登上您自己的王位;
12 १२ जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला, आणि मी त्यांना शिकवलेले नियम पाळले, तर त्यांची मुलेसुद्धा तुझ्या राजासनावर सर्वकाळ बसतील.
若您的子孫遵守我的誓言,也遵守我教訓他們的法典,連他們的子孫代代世世,也必定要坐上您的王位。
13 १३ खचित परमेश्वराने सियोन निवडून घेतली आहे; त्याच्या वस्तीसाठी त्याने इच्छा धरली आहे.
的確上主特別揀選了熙雍,希望熙雍作為自己的王宮:
14 १४ “ही जागा सर्वकाळ माझ्या विसाव्याची आहे; मी येथे राहीन, कारण माझी इच्छा आहे.
就是我的永遠安息之處,我希望的是常在這裏居住。
15 १५ मी तिला विपुलतेने अन्नसामग्रीचा आशीर्वाद देईन; मी तिच्या गरीबांना भाकरीने तृप्त करीन.
我要祝福這裏的食糧充裕,窮人都無憂並且吃得飽飫,
16 १६ मी तिच्या याजकांना तारणाचे वस्त्र नेसवीन; तिचे भक्त आनंदाने मोठ्याने जयघोष करतील.
使這裏的司祭得蒙救助,使這裏的信徒踴躍歡愉。
17 १७ तेथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल असे मी करीन; तेथे मी आपल्या अभिषिक्तासाठी दिवा ठेविला आहे.
在這裏我要使達味的頭角高聳,我要給我的受傅者備妥明燈,
18 १८ मी त्याच्या शत्रूंला लाजेचे वस्रे नेसवीन, परंतु त्याचा मुकुट चमकेल.”
我要使他的敵人個個恥辱備嘗,我要使他的王冠在頭上發光。

< स्तोत्रसंहिता 132 >