< स्तोत्रसंहिता 130 >
1 १ हे परमेश्वरा, मी तुला शोकसागरातून आरोळी मारीत आहे.
De los profundos te llamo, o! Jehová.
2 २ हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या वाणीकडे तुझे कान लक्षपूर्वक लागलेले असोत.
Señor, oye mi voz. Sean tus orejas atentas a la voz de mi oración.
3 ३ हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर, हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल?
Jehová, si mirares a los pecados, Señor ¿quién persistirá?
4 ४ पण त्यांनी तुझे भय धरावे, म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे.
Por lo cual hay perdón acerca de ti: para que seas temido.
5 ५ मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो, आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो.
Yo esperé a Jehová, mi alma esperó: a su palabra he esperado.
6 ६ पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.
Mi alma esperó a Jehová, más que las guardas esperan a la mañana: las guardas a la mañana.
7 ७ हे इस्राएला, परमेश्वरावर आशा ठेव. कारण परमेश्वर दयाळू आहे, आणि त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे.
Espere Israel a Jehová, porque con Jehová está la misericordia; y abundante redención cerca de él.
8 ८ तोच इस्राएलास त्यांच्या सर्व पापांपासून मुक्त करीन.
Y él redimirá a Israel de todos sus pecados.