< स्तोत्रसंहिता 13 >

1 मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरून जाणार आहेस? किती वेळ तू आपले मुख माझ्यापासून लपवणार आहे?
לַמְנַצֵּ֗חַ מִזְמ֥וֹר לְדָוִֽד׃ עַד־אָ֣נָה יְ֭הוָה תִּשְׁכָּחֵ֣נִי נֶ֑צַח עַד־אָ֓נָה ׀ תַּסְתִּ֖יר אֶת־פָּנֶ֣יךָ מִמֶּֽנִּי׃
2 पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु: ख असता, किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू? किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार?
עַד־אָ֨נָה אָשִׁ֪ית עֵצ֡וֹת בְּנַפְשִׁ֗י יָג֣וֹן בִּלְבָבִ֣י יוֹמָ֑ם עַד־אָ֓נָה ׀ יָר֖וּם אֹיְבִ֣י עָלָֽי׃
3 हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून, माझे डोळे प्रकाशीत कर.
הַבִּ֣יטָֽה עֲ֭נֵנִי יְהוָ֣ה אֱלֹהָ֑י הָאִ֥ירָה עֵ֝ינַ֗י פֶּן־אִישַׁ֥ן הַמָּֽוֶת׃
4 मी त्याच्यावर विजय मिळवला असे माझ्या शत्रूला बोलू देऊ नको. म्हणजे माझा शत्रू असे म्हणणार नाही की, मी त्यावर विजय मिळविला आहे. नाहीतर माझे शत्रू मी ढळलो म्हणून उल्लासतील.
פֶּן־יֹאמַ֣ר אֹיְבִ֣י יְכָלְתִּ֑יו צָרַ֥י יָ֝גִ֗ילוּ כִּ֣י אֶמּֽוֹט׃
5 परंतु मी तुझ्या प्रेमदयेवर विश्वास ठेवला आहे. माझे हृदय तुझ्या तारणात हर्ष पावते.
וַאֲנִ֤י ׀ בְּחַסְדְּךָ֣ בָטַחְתִּי֮ יָ֤גֵ֥ל לִבִּ֗י בִּֽישׁוּעָ֫תֶ֥ךָ
6 मी परमेश्वरासाठी गाईन, कारण त्याने मला फार उदारपणे वागवले आहे.
אָשִׁ֥ירָה לַיהוָ֑ה כִּ֖י גָמַ֣ל עָלָֽי׃

< स्तोत्रसंहिता 13 >