< स्तोत्रसंहिता 129 >

1 इस्राएलाने आता म्हणावे की, माझ्या तरुणपणापासून त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे.
上行之诗。 以色列当说:从我幼年以来, 敌人屡次苦害我,
2 त्यांनी माझ्या तरुणपणापासून माझ्यावर हल्ला केला, तरी ते मला पराजित करू शकले नाहीत.
从我幼年以来,敌人屡次苦害我, 却没有胜了我。
3 नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले; त्यांनी आपली तासे लांब केली.
如同扶犁的在我背上扶犁而耕, 耕的犁沟甚长。
4 परमेश्वर न्यायी आहे; त्याने दुष्टांच्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत.
耶和华是公义的; 他砍断了恶人的绳索。
5 जे सियोनेचा तिरस्कार करतात, ते सर्व लज्जित होवोत आणि माघारी फिरवले जावोत.
愿恨恶锡安的都蒙羞退后!
6 ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच सुकून जाते त्यासारखे होवोत.
愿他们像房顶上的草, 未长成而枯干,
7 त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही, किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही.
收割的不够一把, 捆禾的也不满怀。
8 त्यांच्या जवळून येणारे जाणारे म्हणत नाहीत की, “परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर असो; परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो.”
过路的也不说: 愿耶和华所赐的福归与你们! 我们奉耶和华的名给你们祝福!

< स्तोत्रसंहिता 129 >