< स्तोत्रसंहिता 128 >
1 १ जो प्रत्येकजन परमेश्वराचा आदर करतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्यवादित आहे.
不拘您是誰,只要您敬愛上主,在祂的道路上行走,就算有福!
2 २ तू आपल्या हाताच्या श्रमाचे फळ खाशील, तू आनंदित होशील; तू आशीर्वादित होऊन तुझी भरभराट होईल.
您能吃您雙賺來食物,您便幸福!
3 ३ तुझी पत्नी तुझ्या घरात फलदायी द्राक्षवेलीसारखी होईल; तुझी मुले तुझ्या मेजाभोवती बसलेल्या जैतूनाच्या रोपांसारखी होतील.
妻子住在您的內室,像一株葡萄樹結實纍纍;您的子女繞著您的桌椅,相似橄欖樹的枝葉茂密。
4 ४ होय, खरोखर, जो मनुष्य परमेश्वराचा आदर करतो, तो असा आशीर्वादित होईल.
的確,誰敬愛上主,必受這樣的祝福!
5 ५ परमेश्वर तुला सियोनेतून आशीर्वाद देवो; तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमेची उन्नती तुझ्या दृष्टीस पडो.
惟願上主由熙雍聖山向您祝福,使您一生得見耶路撒冷的福祿,
6 ६ तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. इस्राएलावर शांती असो.
使您目睹您的子女的子女,見到以色列的平安富足。