< स्तोत्रसंहिता 127 >
1 १ परमेश्वर जर घर बांधीत नाही, तर तो जे बांधतो ते काम व्यर्थ आहे. जर परमेश्वर नगर रक्षित नाही, तर पहारेकरी उभे राहून रक्षण करतात ते व्यर्थ आहे.
Cantique des degrés. De Salomon. Si l’Éternel ne bâtit la maison, Ceux qui la bâtissent travaillent en vain; Si l’Éternel ne garde la ville, Celui qui la garde veille en vain.
2 २ तुम्ही पहाटे लवकर उठता, रात्री उशीराने घरी येता, किंवा कठोर परिश्रम करून भाकर खाता हे सर्व व्यर्थ आहे कारण परमेश्वर आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो.
En vain vous levez-vous matin, vous couchez-vous tard, Et mangez-vous le pain de douleur; Il en donne autant à ses bien-aimés pendant leur sommeil.
3 ३ पाहा, मुले ही परमेश्वरापासून मिळालेले वतन आहे, आणि पोटचे फळ त्याच्यापासून मिळालेली देणगी आहे.
Voici, des fils sont un héritage de l’Éternel, Le fruit des entrailles est une récompense.
4 ४ तरुणपणाची मुले हे वीराच्या हातातील बाणांसारखी आहेत.
Comme les flèches dans la main d’un guerrier, Ainsi sont les fils de la jeunesse.
5 ५ ज्या मनुष्याचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य! तो वेशीवर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता, ते फजीत होणार नाहीत.
Heureux l’homme qui en a rempli son carquois! Ils ne seront pas confus, Quand ils parleront avec des ennemis à la porte.