< स्तोत्रसंहिता 125 >
1 १ जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात; ते सियोन पर्वतासारखे अढळ, सर्वकाळ टिकणारे आहेत.
Þeir sem treysta Drottni eru eins og Síonfjall, þeir haggast ekki.
2 २ यरूशलेमेच्या सभोवती पर्वत आहेत तसा परमेश्वर त्याच्या लोकांसभोवती आता आणि सर्वकाळ आहे.
Fjöllin umhverfis Jerúsalem eru henni til verndar, eins er Drottinn, hann umlykur og verndar sitt fólk.
3 ३ नितीमानाचे हात दुष्टांना लागू नयेत म्हणून दुर्जनांचा राजदंड नितीमानांच्या वतनावर चालणार नाही. नाहीतर नितीमान जे काही चुकीचे आहे ते करतील.
Ekki skulu óguðlegir drottna yfir trúuðum, né réttlátir þvingaðir til illverka.
4 ४ हे परमेश्वरा, जे चांगले आहेत, आणि जे आपल्या हृदयाने सरळ आहेत त्यांचे तू चांगले कर.
Ó, Drottinn, gerðu vel við þá sem góðir eru, þá sem leitast við að gera vilja þinn,
5 ५ पण जे आपल्या वाकड्या मार्गाकडे वळतात, परमेश्वर त्यांना वाईट करणाऱ्याबरोबर घालवून देईल. इस्राएलांवर शांती असो.
en útrýmdu illgjörðamönnum. Láttu frið og velgengni ríkja í Ísrael.